चोरी गेलेल्या ऐवजासह चोरटा जेरबंद

By Admin | Updated: December 3, 2014 23:50 IST2014-12-03T23:50:10+5:302014-12-03T23:50:10+5:30

रिसोड तालुक्यातील मोप येथील जबरी चोरीप्रकरण.

Thieves with stolen apps | चोरी गेलेल्या ऐवजासह चोरटा जेरबंद

चोरी गेलेल्या ऐवजासह चोरटा जेरबंद

रिसोड (वाशिम): एका वृध्द महिलेस धाक दाखवून सोने व चांदीचे दागिने पळविणार्‍या चोरास मुद्देमालासह पकडल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली.
तालुक्यातील मोप येथील वयोवृध्द महिला लोणी रोड वरील शेतामध्ये गवत कापण्याचे काम करीत असताना महिलेस मारहाण करून तीच्या शरीरावरील सोने व चांदीचे दागिने जबरीने चोरून नेल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी शेतशिवारात घडली होती. या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागल्यानंतर तपासाअंती गावातील अच्युतराव मोरे यास अटक करून त्याच्याकडील ३ तोळे सोने, ४0 तोळे चांदी असे एकूण ९५000 रूपयाचा माल जप्त केला आहे. आरोपीस अटक करून त्याच्याविरूध्द कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Thieves with stolen apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.