महिलेच्या सतर्कतेमुळे अट्टल चोरटा जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 16:36 IST2019-02-01T16:36:40+5:302019-02-01T16:36:57+5:30
वाशिम : तालुक्यातील काटा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाºया टोळीतील एका चोरट्याला गावकºयांनी हर्षा नितीन खडसे या महिलेच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडले.

महिलेच्या सतर्कतेमुळे अट्टल चोरटा जेरबंद!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुक्यातील काटा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाºया टोळीतील एका चोरट्याला गावकºयांनी हर्षा नितीन खडसे या महिलेच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडले. ही घटना १ फेब्रुवारीला रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
वाशिम येथील सामान्य रूग्णालयाच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी विशाल कालबाल्या चव्हाण (वय २८) याच्यासह अन्य तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी १ फेब्रुवारीला रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास काटा गावात चांगलाच धुमाकुळ घातला. या चोरट्यांनी गावातील घनश्याम पोरवाल, वसंतकुमार बांडे, शिवाजी इंद्रभान कंकणे यांचे बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, पोरवाल यांच्या घराचे कुलूप तोडत असताना शेजारीच वास्तव्यास असलेल्या हर्षा खडसे यांना आवाज आल्याने त्या झोपेतून जाग्या झाल्या. त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता, समोरच्या घरामध्ये चोरटे शिरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेच ही माहिती त्यांनी आपले पती नितिन खडसे यांना दिली. यावेळी पळून जाणाºया चोरट्यांचा नितिन खडसे यांनी पाठलाग केला. त्यामधील विशाल चव्हाण हा एकमेव चोरटा त्यांच्या हाती लागला. यावेळी विशाल चव्हाणने नितिन खडसे यांच्यावर चाकुने हल्ला करून त्यांना जखमी केले. प्रसंगावधान राखून खडसे यांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावून त्याला पकडून ठेवले. त्यानंतर गावकºयांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याला अटक करून त्याच्याविरूध्द भादंविचे कलम ३७९, ५११, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजय नरडे करीत आहेत.