शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

वाशिम जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्न झाला गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:38 PM

वाशिम : जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्नही गंभीर झाला असून यामुळे संस्थाचालक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देअतिरिक्त ठरणाºया शिक्षकांचे समायोजन होणे अथवा ज्या शाळांवर गरज नसतानाही कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे आवश्यक आहे.पगारावर होणारा अधिकचा खर्च वाचण्यासोबतच भविष्यात शाळांसाठी डोकेदुखी ठरणारा हा विषय निकाली निघणे शक्य आहे.शालार्थ प्रणालीत उद्भवलेल्या घोळामुळे संचमान्यतेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 वाशिम : केंद्रशासनाने संपूर्ण देशाला ‘डिजीटायझेशन’ करण्याचा निर्धार करून त्यादिशेने आशादायक पाऊले उचलली. मात्र, शालेय कारभारात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी अंमलात आलेल्या शालार्थ प्रणालीत गेल्या तीन महिन्यांपासून विविध स्वरूपातील अडथळे उद्भवले असून शासनाच्या ‘डिजीटायझेशन’च्या धोरणास यामुळे तडे पोहचत आहेत. अशातच जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेचा प्रश्नही गंभीर झाला असून यामुळे संस्थाचालक हैराण झाले आहेत.जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण होऊन अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांचे समायोजन होणे अथवा ज्या शाळांवर गरज नसतानाही कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे आवश्यक आहे. यामुळे पगारावर होणारा अधिकचा खर्च वाचण्यासोबतच भविष्यात शाळांसाठी डोकेदुखी ठरणारा हा विषय निकाली निघणे शक्य आहे. मात्र, शालार्थ प्रणालीत उद्भवलेल्या घोळामुळे संचमान्यतेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षण संस्थाचालक धास्तावले!जिल्ह्यातील काही शाळांवर पटसंख्येप्रमाणे गरज नसताना अधिकचे शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे त्यांना २०१३-१४ च्या संचमान्यतेनुसार पगारही दिला जात आहे. भविष्यात मात्र यासंदर्भात लेखा परिक्षण होऊन संबंधित शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आल्यास त्यांच्या पगारीवर झालेल्या खर्चाची भरपाई कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने शिक्षण संस्थाचालक चांगलेच धास्तावले आहेत. यावर प्रभावी तोडगा म्हणून नवी संचमान्यता लवकर होणे गरजेचे आहे, असा सूर या घटकातून उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र