शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

बर्निंग बाईकचा थरार; पाहता पाहता बेचिराख झाल्या दोन ईलेक्ट्रिक बाईक!

By नंदकिशोर नारे | Updated: April 25, 2023 16:12 IST

बर्निंग बाईकचा हा थरार वाशिम शहरातील पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. 

वाशिम: बॅटरी चार्जिंगला लावली असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ईलेक्ट्रिक बाईकने पेट घेतला. लगतच्या बाईकही आगीच्या कवेत आल्या अन् पाहता पाहता दोन इलेक्ट्रिक बाईक अवघ्या काही मिनिटांतच बेचिराख झाल्या, तर इतर तीन बाईकचेही नुकसान झाले. बर्निंग बाईकचा हा थरार वाशिम शहरातील पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. 

मागील काही दिवंसापासून वाढत्या उन्हामुळे वाहने पेटण्याच्या घटनांत वाढ होत आहे. याच आठवड्यात वाशिम शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उभी कार पेटल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पाटणी कर्मशियल कॉम्पलेक्समध्ये पुन्हा बर्निंग बाईकचा थरार नागिरकांनी अनुभवला. इलेक्ट्रिक बाईक रिपरेअरिंगच्या दुकानात दुरुस्तीसाठी आणलेली एक इलेक्ट्र्रिक बाईक चार्जिंगला लावली असताना काही वेळाने उन्हामुळे शॉर्टसर्किट होऊन ती पेटली, लगेच जवळ उभ्या बाईकने पेट घेतला. 

परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना हे चित्र दिसताच त्यांनी धावाधाव करून इतर बाईक हटविल्या. त्यावेळी जवळच असलेल्या गजानन भोजनालयाच्या संचालकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी धावाधाव करून पाणी टाकत आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु तोपर्यंत दोन बाईक जळून खाक झाल्या, तर इतर तीन बाईकचेही थोडेफार नुकसान झाले. घटनेची माहिती मिळतास वाशिम पालिकेचे अग्नीशमन दल दाखल झाले; परंतु तोपर्यंत दोन बाईक जळून खाक झाल्या होत्या.

वाहनांना उन्हात ठेवणे घातकजिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशात कुठलेही वाहन रखरखत्या उन्हात उभे करणे घातक ठरू शकते. यातून केवळ वाहनच राख होण्याची भिती नाही, तर लगतचा परिसरही आगीच्या कवेत येण्याची भिती आहे.

थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीपाटणी कर्मशियलमध्ये ईलेक्ट्रिक बाईक पेटल्याची घटना घडल्याचे कळताच संपूर्ण कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक, नागरिकांसह परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पेटलेल्या ईलेक्ट्रिक बाईक पाहण्यासाठी शेकडो जणांनी गर्दी केली होती. यावेळी निघालेल्या धुराचे काळेकुट्ट लोळ आकाशात पसरल्याने आगीची भीषणता स्पष्ट होत होती. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरwashimवाशिमbikeबाईक