शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

आसेगाव परिसरात डवरणीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 4:55 PM

आसेगाव (वाशिम) : परिसरातील गावांत खरीपाची पेरणी ९० टक्के उरकली असून, आता बहतर असलेल्या पिकांत तणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकºयांनी डवरणीसह फवारणीच्या कामाला वेग दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : परिसरातील गावांत खरीपाची पेरणी ९० टक्के उरकली असून, आता बहतर असलेल्या पिकांत तणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकºयांनी डवरणीसह फवारणीच्या कामाला वेग दिला आहे. त्यात पावसामुळे सर्वत्र हिरवळ निर्माण झाली असून, गुरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. मंगरुळपीर तालुक्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने खरीपांच्या पेरणीला वेग आलेला आहे. आसेगाव परिसरात २३ जुनपासून पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला. सद्यस्थितीत परिसरातील ९० टक्के पेरणी उरकली आहे. त्यात सोयाबीनचे प्रमाण ७५ टक्के, तर मुग, उडिद आणि तुरीसह कपाशीच्या पिकाचे प्रमाण २५ टक्के आहे. आता खरीपाची बहुतांश पिके वितभर वाढल्यानंतर पिकांत तण वाढू नये म्हणून शेतकºयांनी डवरणीसह फवारणीच्या कामांना वेग दिल्याचे चित्र दिसत आहे. त्यात दमदार पावसामुळे हिरवा चारा उगवला असून, सर्वत्र हिरवळ पसरल्याने गुरांच्या चाºयाचा प्रश्न मिटला आहे. त्यात शिवारातील लहानसहान खड्ड्यांसह छोट्या तलावात जलसंचय झाल्याने गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही मिटली आहे. शिवारात गुराखी निवांत गुरे चारत असतानाचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.  सायकल डवऱ्याचा वापर अधिकआसेगाव परिसरात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून, डवरणीसाठी बैल वा मजूर लावण्याची त्यांची क्षमता नाही. अशात सायकल डवरा अर्थात एका माणसाला सहज चालविता येईल, अशा हात डवºयाचा वापर अल्पभूधारक शेतकरी करताना दिसत आहेत. अल्प किमतीत मिळणारे आणि सहज हाताळता येणारे हे सायकल डवरणी यंत्र अल्पभूधारक शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी