वाशिम जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:15 IST2021-02-15T12:14:53+5:302021-02-15T12:15:02+5:30

Washim News स्वामित्व योजनेंंतर्गत ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

Survey of villages by drone in Washim district | वाशिम जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण

वाशिम जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण

वाशिम: गावठाणातील जागाधारकाच्या जमिनीचे मोजमाप करून त्याचा मालकी हक्क अधिकृतपणे देण्यासाठी जिल्ह्यात स्वामित्व योजना राबविली जात आहे. या योजनेंंतर्गत ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे त्यांच्या मिळकतीचे अभिलेख, अधिकृत मालकी हक्काचा पुरावा नसल्याने त्यांना बँक कर्ज मिळविणे किंवा मालमत्ता हस्तांतरण करताना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या मिळकतधारकांची मोठी गैरसोय होते. तसेच गावठाणाचे नकाशे, अभिलेख नसल्याने विविध विकास योजना राबविताना ग्रामपंचायतींनासुद्धा अडचणी येतात. कर आकारणी, बांधकाम परवानगी यासारख्या बाबींसाठी सुलभता आणण्यासाठी गावठाणाचे नकाशे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाणाचे नकाशे तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्येक मिळकतीची सीमा निश्चित होईल, तसेच त्याचे नेमके क्षेत्रही माहिती होणार असल्याने मिळकतधारक व ग्रामपंचायत यांना अधिकृत दस्तावेज उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Survey of villages by drone in Washim district