शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

टेरका येथील गौण खनिज उत्खनन परिसराची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 3:44 PM

३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने शनिवारी उघडकीस आणताच महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली.

संतोष वानखडे/बबन देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/मानोरा : जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नसताना, मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने शनिवारी उघडकीस आणताच महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने अहवाल मागविला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी टेरका येथील घटनास्थळाची पाहणी केली.गौण खनिज उत्खनन किंवा खनिपट्टा मिळण्यासाठी शेतजमीन अकृषक परवाना, ग्राम पंचायतचा ठराव,  ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र, पर्यावरण विभागाची परवानगी यासह  जवळपास २९ अटींची पुर्तता करावी लागते. मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) या उजाड गाव परिसरात कोणताही परवाना किंवा आदेश मिळण्यापूर्वीच गौण खनिज उत्खनन केले जात आहे.यासंदर्भात हट्टी ता. मानोरा येथील पृथ्वीराज उल्हास राठोड यांनी मानोरा तहसिलदार तसेच जिल्हा खनिकर्म विभागाकडे तत्कार केली तसेच माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली. गट क्रमांक १७/१ व १७/२ चा खनिपटा मिळण्याबाबतचा अर्ज जिल्हा खनिकर्म कार्यालयास प्राप्त झाला असून सदर प्रकरणात अद्यापपर्यंत आदेश पारीत झालेला नाही तसेच या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना देण्यात आलेला नाही, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. कोणताही परवाना मिळालेला नसताना, तेथे ३०० पेक्षा अधिक क्षमतेची टीपीएच क्रेशर मशीन बसविण्यात आली, दगड उत्खनन करण्यासाठी ब्लास्टिंग मशीन व पाच ते सहा मोठ्या पोकलेन, दोन मोठे जनरेटर, अंदाजे २५ ते ३० मोठे टिप्पर असून, ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन केल्याची तक्रार पृथ्वीराज राठोड यांनी तहसिल कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली. परंतू, यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात लोकमतने ३१ ऑगस्टच्या अंकात सचित्र वृत प्रकाशित करताच, महसूल यंत्रणेत एकच खळबळ उडाली. वरिष्ठांच्या निर्देशानुसार तपासाची चक्रे जलदगतीने फिरली असून, शनिवारी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हा अहवाल उपविभागीय अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :washimवाशिम