शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

उन्हाळी सुट्या संपल्या; विद्यार्थी पुन्हा ‘ऑनलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 11:09 IST

Summer vacation over; Students 'online' again : काही खासगी शाळांनी शिक्षणाचे धडे देणे सुरू केले असून या शाळांमधील विद्यार्थी पुन्हा एकदा ‘ऑनलाइन’ शिक्षणासाठी सज्ज झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी निवळले; मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून यंदाही नवे शैक्षणिक सत्र शाळांमध्ये सुरू होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे उन्हाळी सुट्या संपल्यानंतर काही खासगी शाळांनी शिक्षणाचे धडे देणे सुरू केले असून या शाळांमधील विद्यार्थी पुन्हा एकदा ‘ऑनलाइन’शिक्षणासाठी सज्ज झाले आहेत.दरवर्षी साधारणत: २८ जूनपासून राज्यभरातील सर्वच शाळा सुरू होतात; मात्र गतवर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवले. त्यानंतर काहीच दिवसांत सर्वच ठिकाणच्या शाळा बंद करण्याचे फर्मान शासनस्तरावरून सुटले. यामुळे २०२०-२१ चे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन लाटानंतर आता तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषत: या लाटेत लहान मुले बाधीत होतील, असे संकेत आहेत. त्यामुळेच २०२१-२२ चे नवे शैक्षणिक सत्रही सुरू होण्याबाबत अद्यापपर्यंत शासनस्तरावरून कुठलीही ठोस हालचाल झालेली नाही.दुसरीकडे शासकीय शाळांप्रमाणेच खासगी शाळांनीही २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात ऑनलाइन शिक्षण कायम ठेवले. उन्हाळी सुटी संपल्यानंतर नव्या शैक्षणिक सत्रालाही ऑनलाइन पद्धतीनेच सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही खासगी  शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी ऑनलाइन क्लासेसमध्ये गुंतल्याचे दिसत आहे.

यंदाही वाजणार नाही शाळांची घंटाजिल्ह्यात पहिली ते १२ वीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या एकूण १३७८ शाळा आहेत. त्यातील खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे; मात्र जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या अखत्यारित असलेल्या शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही २८ जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार नाहीत; मात्र दहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. इतर वर्गशिक्षकांसाठी हे प्रमाण ५० टक्के ठेवण्यात आले आहे.

मोफत पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षायंदाही ऑनलाइन पद्धतीनेच नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे; मात्र अद्यापपर्यंत शासनस्तरावरून पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. ती कधी मिळणार, याची प्रतीक्षा विद्यार्थी, पालकांना लागून आहे.

जिल्ह्यातील काही खासगी  शाळांनी मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे सुरू केले आहे. शासकीय शाळांकडून २८ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू केले जाणार असले तरी ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण दिले जाणार आहे. १० वी ते १२ वीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे; तर पहिली ते नववीपर्यंत ५० टक्के शिक्षक उपस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ५ हजार ५५० मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविलेली आहे.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणonlineऑनलाइनStudentविद्यार्थी