विहिर पुनर्भरणाने सुभाष चौक परिसर जलसमृध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 15:33 IST2019-07-20T15:32:55+5:302019-07-20T15:33:14+5:30
मुख्याध्यापक सुरेश खरावन यांनी परिसरातील नागरिकांना सोबत घेवून विहिर पूनर्भरण केले अन या परिसरातील पाणी टंचाई दूर झाली.

विहिर पुनर्भरणाने सुभाष चौक परिसर जलसमृध्द
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विहिर, कुपनलिका व नगरपालिकेचे नळ असतानाही पाण्याचे दुर्भिक्ष्य. दरवर्षी उन्हाळयात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खरावन यांनी परिसरातील नागरिकांना सोबत घेवून विहिर पूनर्भरण केले अन या परिसरातील पाणी टंचाई दूर झाली. आजच्या घडीला हा भाग जलसमृध्द झाला आहे.
जल है तो कल है , पाणी हेच जिवन या अनुषंगाने काळाची गरज ओळखून काटीवेश, सुभाषचौक,भटगल्ली वाशीम येथील डॉ.प्रदीप फाटक यांचे घरासमोरील विहीरीत घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी फिल्टर करून पाईपद्वारे विहीरीत सोडण्याच्या उपक्रमाचे उदघाटन,सालाबादाप्रमाणे याहीवर्षी १८ जुलै २०१९ गुरूवार रोजी करण्यात आले. रा.ल.कन्या शाळा वाशीमचे सचिव मा.डॉ.प्रदीप फाटक यांचे शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जल है तो कल है..हे वाक्य बालमनावर खोलवर रुजवायला पाहीजे.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सदर उपक्रम रा.ल. कन्या शाळा वाशीमचे उपमुख्याध्यापक सुरेश खरावन यांच्या पुढाकाराने सन २००९ पासून सुरु आहे. तीन घराच्या छतावरील पावसाचे पाणि गाळून विहीरीत सोडले जाते. याचा फायदा वेटाळातील सर्वच नागरिकांना होतो. सदर उपक्रमाची बांधनी करण्यासाठी शाम खुळे,अक्षय गारी, क्रुष्णा खुळे,स्वराज सोसे, योगेश कोष्टी , शंकर खुळे ,अमन तोळंबे यांनी सहकार्य केले. यावेळी,प्रत्येक विहीरीवर हा उपक्रम राबवायला पाहीजे ,अशी अपेक्षा संकल्पनाकार सुरेश खरावन यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा सर्वांनाच होत असल्याची भावना उपस्थीत नागरिकांनी व्यक्त केली.
सदर उपक्रमास डॉ.प्रदीप फाटक,मनोहर आलमवार,पुरूषोत्तम दुरतकर,विश्वनाथ पाटील नाईकवाडे,शिवआप्पा आलमवार ,गोपाल ठाकूर,सुनिल तोळंबे,सुरेश इथापे, सागर खरावन ,गणेश ठाकूर ,पंकज खुळे इत्यादींचे मार्ग दर्शन लाभत असते.
दुष्काळीपरिसर बनला पाणीदार
२००९ मध्ये वाशिम शहरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. यावेळी सुभाष चौकातील अनेक नागरिक यावर चर्चा करायचे. राणी लक्ष्मीबाई शाळेचे मुख्याध्यापक सुरेश खरावण यांनी त्यावेही विहिर पूनर्भरणाचा विषय सर्वांसमोर मांडला. काहींनी सुरुवातीला विरोध केला तर काही जण सोबत होते. असे असतांना सुरवातीला विहिरीतील उपसा केला व नंतर ज्यांची इच्छा होती त्यांच्या छतावरील पाणी विहिरीत सोडले. छताचे पाणी फिल्टर व्हावे असे नियोजन केले. २०१० मध्ये शहरात पाणी टंचाई जाणवली परंतु तेथे मात्र मुबलक पाणी होते. तेव्हापासून पावसाळयात हा उपक्रम अविरत सुरु आहे.