शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

कारंजाच्या विद्यार्थ्याने बनविला १६५ रुपयात ‘स्मार्ट वॉश बेसिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 3:58 PM

मान्यवरांच्या हस्ते गौरव   कारंजा : विज्ञान प्रतिकृतीतून पाणी बचतीचा मार्ग शोधून तन्मन खाडे याने कारंजा तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात ...

मान्यवरांच्या हस्ते गौरव कारंजा : विज्ञान प्रतिकृतीतून पाणी बचतीचा मार्ग शोधून तन्मन खाडे याने कारंजा तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात मानाचा तुरा खोवला आहे. येथील जे.डी चवरे येथील विद्यार्थी तन्मय गोपाल खाडे याने शिक्षक अजय मोटघरे व वडील गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात पाणी बचतीचा अभिनव शोध लावला. पाण्याची समस्या दिवसांदिवस बिकट होत आहे. वेगळ्या कारणांसाठी पाणी वापरले जाते. सोबत पाण्याचे महत्व न कळल्याने ते वाया पण घातल्या जाते. सकाळी उठल्यावर माणुस बेसिनवर दात घासुन तोंड धुतो.  बरेचं जण दिवसातुन २ ते ३ वेळा तोंड धुतात. दात घासणे व तोंड धुवायला जितके पाणी लागते त्यापेक्षा जास्त पाणी वाया जाते. साधारणपणे एक व्यक्ती एका वेळी एक लिटर पाणी वापरतो. म्हणजे अर्धा लिटर पाणि वाया घालतो. भारतातील वॉश बेसीन वापरणाºया लोकसंख्येचा विचार केला तर अब्जो लिटर पाण्याची नासाडी होते. यावर उपाय म्हणुन तन्मयने हा स्मार्ट वॉश बेसिन तयार केला; जो काम असलं की सुरु आणि काम नसले की पायाने बंद होईल.यात सध्याच्या वॉश बेसिनमधे थोडा बदल केला आहे. टाकीतुन येणाºया पाईपला बेसिनच्या खाली नरम प्लॅस्टिक पाईप लावला, जो दबल्या जाईल. दोन लाकडी पाट्या घेवुन बिजागिरीने त्या जोडल्या, त्यात स्प्रिंग लावले. त्यातुन पाईप टाकला. पाय दबला की पाईप पाटीत दबुन बंद व स्प्रिंग सोडला की नळी मोकळी होऊन पाणि सुरु होइल. पायाने पाटी दबली की नळ बंद व पाटी वर आली की नळ सुरु होणार आहे. पाणी हातात घेतले की नळ पायाने बंद करता येतो. त्यामुळे पाण्याची खुप बचत होते. सदर विज्ञान प्रतिकृती कारंजा येथील जिल्ह्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड  प्रदर्शनीत ठेवली होती. सदर प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, एस. एस.एस. के.इन्नानी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पि.आर.राजपुत, एन.आय.एफ.चे समन्वयक विशाल वाघमारे, शिक्षण उपनिरीक्षक आकाश आहाळे, अकोला माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, कारंजाचे गटशिक्षणाधिकारी सु.म.अघडते, विज्ञान अध्यापक मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ.रविंद्र भास्कर, उपाध्यक्ष विजय भड,अकोला विज्ञान अध्यापक मंडळाचे प्रतिनिधी धम्मदिप इंगळे,डॉ. आर.सी.मुकवाने आदि मान्यवरांनी तन्मयचा सन्मान केला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाStudentविद्यार्थी