Student commit suicide by removing pornography from classmates, types in Washim | वर्गमित्रानेच अश्लील चित्रफित काढल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, वाशिममधील प्रकार

वर्गमित्रानेच अश्लील चित्रफित काढल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, वाशिममधील प्रकार

मंगरुळपीर (वाशिम) : वर्गमित्राने अश्लील चित्रफीत काढल्यामुळे मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार ३ डिसेंबर रोजी घडला. याप्रकरणी जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकासह अन्य एकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीला वर्गमित्राने जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रसाधनगृहात बोलाविले व दीपक महादेवराव वानखडे या मित्राच्या मदतीने व्हिडिओ क्लिप काढली. त्यानंतर सदर क्लिप इतरांच्या मोबाइलवर पाठविली. या प्रकारानंतर आपली बदनामी होईल, या भीतीने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ डिसेंबरला विद्यार्थिनीचा अल्पवयीन मित्र व दीपक वानखडे या दोघांविरुद्ध कलम ४४९, ३०६, ३४ तसेच आय टी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आणि नंतर दोघांना अटक केली. यातील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला आहे.

त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी शिक्षक अरुण नारायणराव चव्हाण (५२) व या प्रकरणात सहभागी असलेला रवी महादेवराव म्हातारमारे (४२) यांना अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Student commit suicide by removing pornography from classmates, types in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.