वीज समस्यांविरोधात राकाँचा मालेगाव येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:32 IST2018-10-26T15:32:03+5:302018-10-26T15:32:30+5:30
मालेगाव (वाशिम) : जादा वीज भारनियमन, प्रलंबित कृषीपंप जोडणी, अनियमित वीजपुरवठा आदी महावितरणशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव येथील शेलु फाटा येथे २६ आॅक्टोबरला दुपारी २ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.

वीज समस्यांविरोधात राकाँचा मालेगाव येथे रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : जादा वीज भारनियमन, प्रलंबित कृषीपंप जोडणी, अनियमित वीजपुरवठा आदी महावितरणशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव येथील शेलु फाटा येथे २६ आॅक्टोबरला दुपारी २ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.
मालेगाव तालुक्यातील कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याकरीता मेडशी ३३ केव्ही उपकेंद्र येथे पुरेशा क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविणे तसेच किन्हीराजा, शिरपूर, जऊळका रेल्वे व तालुक्यातील कृषीपंप जोडणी देण्याबाबत जे रोहीत्र मंजुर आहेत, त्याची कामे त्वरीत सुरू करावे, सर्व ठिकाणी लाईनमन देण्यात यावे, भारनियमन कमी करावे, तांत्रिक बिघाडानंतर तातडीने विद्युत रोहित्र द्यावे यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी पक्ष निरीक्षक भाष्करराव काळे, राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीपराव जाधव यांच्या नेतृत्त्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होती. महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, मालेगावचे उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनानी यांनी घटनास्थळी येऊन भरनियमन कमी करणे, कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करणे, नादुरूस्ती विद्युत रोहित्र बदलून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बाजार समिती उपसभापती गणपतराव गालट, नारायण शेंडगे, शेख गनीभाई, बबनराव मिटकरी, नारायण शिंदे, उल्हासराव घुगे, माजी सभापती बबनराव चोपडे, बाळासाहेब सावंत अरुण बळी, गजानन सारस्कर, विलास रोकडे, रामेश्वर घुगे, गणेश उंडाळ, सोनू सांगळे, सतीश घुगे, राजकुमार शिंदे, गोपाल वानखेड़े, संजय दहात्रे, विष्णु पाटिल राउत, अरविंद गावडे, सुनील चंदनशिव सेवा राम आडे, अशोक गावंडे गोपाल कुटे, वंसत कुटे, विजय गायकवाड, उल्हास राव घुगे, अक्षय गायकवाड,Þ दिगंबर खाडे, अशोक गायकवाड़, गणेश गायकवाड़, बलिराम राठोड़, शेषराव गोटे यांच्यासह राकाँ पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.