Sting Operation : ग्रामीण भागांत खुलेआम रंगताहेत जुगारांचे डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:25 IST2018-10-28T13:25:33+5:302018-10-28T13:25:57+5:30
जोगलदरी (वाशिम): परिसरातील ग्रामीण भागांत गावातील चावडीच्या ठिकाणी खुलेआम पैशांवर जुगाराचे डाव खेळले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Sting Operation : ग्रामीण भागांत खुलेआम रंगताहेत जुगारांचे डाव
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगलदरी (वाशिम): परिसरातील ग्रामीण भागांत गावातील चावडीच्या ठिकाणी खुलेआम पैशांवर जुगाराचे डाव खेळले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरुण पीढी वाममार्गावर लागून भविष्य उद्ध्वस्त करीत असल्याचे दिसत असतानाही या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब उघड झाली आहे.
जिल्ह्यात अवैध दारूविक्री, वरली मटक्यांसह इतर अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत असताना ग्रामीण भागांत अगदी गावातील खुल्या जागेत बिनदिक्कत पत्त्याच्या जुगारांचे डाव खेळले जात असताना स्थानिक पोलीस प्रशासन आणि बिट जमादारांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून लोकमतच्यावतीने काही ठिकाणी स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यामध्ये काही तरूण मंडळी सर्रासपणे गावात पैशाने पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. दुपारी १२ वाजतापासून भरविला जाणारा पत्त्याच्या जुगाराचा डाव सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालत असल्याचेही यातून स्पष्ट झाले. जुगारात तरूण मंडळी नाहक वेळ आणि पैसे गमावून आपले भविष्य उद्ध्वस्त करीत असताना पोलीस प्रशासनाला हा प्रकार का दिसत नाही, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.