रेशिम शेतीसाठी वाशिम जिल्ह्यात तुती रोपनिर्मितीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:48 IST2019-02-11T13:47:55+5:302019-02-11T13:48:01+5:30
वाशिम : जिल्ह्यात १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या महारेशीम नोंदणी अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या ४८० शेतकऱ्यांना तुती लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील निम्म्याहून अधिक शेतकºयांनी कोषनिर्मितीसाठी तुती रोपनिर्मिती सुरू केली आहे.

रेशिम शेतीसाठी वाशिम जिल्ह्यात तुती रोपनिर्मितीस प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात १७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या महारेशीम नोंदणी अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या ४८० शेतकऱ्यांना तुती लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील निम्म्याहून अधिक शेतकºयांनी कोषनिर्मितीसाठी तुती रोपनिर्मिती सुरू केली आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी रेशीम शेतीकडे वळावे, या उद्देशाने जिल्ह्यात महारेशीम नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या चित्ररथाच्या आधारे रेशीम शेतीविषयी जनजागृती करण्यात आली आणि या अभियानाला जिल्ह्यातील शेतकºयांचा उदंड प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातील तब्ब्ल ४८० शेतकºयांनी रेशीम शेतीसाठी नोंदणी केलीे. शेतीला रेशीम उद्योगाची जोड देण्याच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले. रेशीम शेती करण्यास तयारी दर्शविणाºया आणि प्रत्यक्ष नोंदणी करणाºया शेतकºयांना तुती लागवडीपूर्वी तुती रोपनिर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी करणाºयांना शेतकºयांचे वाशिम तालुक्यातील टो या गावात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रेशीम कार्यालयाच्यावतीने शेतकºयांना रोपनिर्मितीविषयी प्रात्यक्षिकाद्वारे या अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले आहे. रेशीम शेतीसाठी तुती लागवडीचे प्रशिक्षण घेणाºया शेतकºयांनी तुतीच्या लागवडीला सुरुवात केली आहे. तुती लागवडीचा कालावधी १५ जून ते १५ जुलैदरम्यान असल्याने शेतकºयांनी रोपनिर्मितीला वेग दिला असून, नोंदणी करणाºया शेतकºयांपैकी निम्म्या शेतकºयांनी रोपनिर्मितीस सुरुवात केल्याचे रेशिम विकास अधिकाºयांनी सांगितले.