वाशिम जिल्ह्यात दीड महिन्यानंतर एसटी धावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:27 AM2020-05-09T10:27:34+5:302020-05-09T10:27:43+5:30

पहिल्या दिवशी मोजक्याच प्रवाशांनी जिल्ह्यांतर्गत बसमधून प्रवास केला.

ST ran after a month and a half in Washim district! | वाशिम जिल्ह्यात दीड महिन्यानंतर एसटी धावली !

वाशिम जिल्ह्यात दीड महिन्यानंतर एसटी धावली !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रीन झोनमध्ये समावेश झाल्याने, जिल्ह्यात २१ मार्चपासून ठप्प असलेली महामंडळाची बससेवा ८ मे पासून पूर्ववत झाली. दरम्यान पहिल्या दिवशी मोजक्याच प्रवाशांनी जिल्ह्यांतर्गत बसमधून प्रवास केला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्चपासून लालपरीचा चक्काजाम केला. त्यामुळे २१ मार्चपासून राज्यभरातील बसगाड्या आहे तिथेच थांबविण्यात आल्या आहेत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, वाशिम, रिसोड या चार आगारांचा समावेश होता. कोरोना संक्रमणामुळे दररोजच्या फेऱ्या थांबल्याने जिल्ह्यातील बसेसचा प्रवासही रद्द झाला झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास पाच ते सात कोटींचा फटका चारही आगारांना बसला आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने संचारबंदी व लॉकडाउनमधून बºयाच अंशी शिथिलता मिळाल्याने बाजारपेठ पूर्ववत होत आहे. याप्रमाणेच जिल्ह्यांतर्गत बस सेवेलाही काही अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली. ५० टक्के आगार तसेच बसेसमध्ये ५० टक्के प्रवाशी या तत्वावर जिल्ह्यांतर्गत ८ मे पासून बससेवा सुरूवात झाली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ४७ दिवसानंतर ८ मे रोजी रिसोड आगार सुरू झाला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता रिसोड येथील आगारात काही बसेस उभ्या होत्या. पहिली बस रिसोड ते मालेगाव व रिसोड ते वाशिम या मार्गे धावली. यामध्ये वाहक व चालक म्हणून नारायण पवार, पांडुरंग डाखोरे मोतीराम भिसडे, दिलीप देशमुख यांनी कर्तव्य दिले. दरम्यान, रिसोड आगारातून शुक्रवारी दिवसभरात केवळ ११ प्रवाशांनी बसमधून प्रवास केल्याची माहिती आगार व्यवस्थापक अनिरूद्ध मेहत्रे यांनी दिली. शिरपूर येथे रिसोड ते मालेगाव अशा दोन बसफेºया धावल्या. मात्र, या बसमध्ये शिरपूर येथून एकही प्रवासी चढला नाही किंवा बसमधून उतरला नाही. शिरपूर येथील बस डेपोमध्ये एकही प्रवाशी नव्हता. रिसोड येथील आगारातही चार ते पाच प्रवाशी दुपारच्या सुमारास होते. वाशिम आगारातही हीच परिस्थिती दिसून आली.
 
रिसोड आगारात ८ मे पासून रिसोड ते वाशिम व रिसोड ते मालेगाव अशी बससेवा सुरू झाली. दक्षता घेण्याच्या सूचना चालक व वाहकांना दिल्या आहेत. प्रवाशांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
-अनिरूद्ध मेहत्रे,
आगार प्रमुख रिसोड

Web Title: ST ran after a month and a half in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.