तुरीवरील किड नियंत्रणासाठी फवारणीचे काम तेजीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:50 IST2019-11-11T13:49:44+5:302019-11-11T13:50:02+5:30
तुरीवरील किड नियंत्रणासाठी फवारणीचे काम तेजीत!

तुरीवरील किड नियंत्रणासाठी फवारणीचे काम तेजीत!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सोयाबिनपाठोपाठ तुरीचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मध्यंतरी आलेला अवकाळी पाऊस आणि त्यामुळे उद्भवलेल्या किड रोगामुळे तूर धोक्यात सापडली होती; मात्र योग्य उपाययोजना करून शेतकºयांनी वेळीच रासायनिक औषध फवारणी सुरू केल्याने तथा सद्या अनुकूल वातावरण असल्याने तूरीची वाढ समाधानकारक असल्याची माहिती काही शेतकºयांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी यंदा सोयाबिनसोबतच तूरीला प्राधान्य दिले आहे. तुर पिकाची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होत आहे; मात्र २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे तद्वतच सकाळ व सायंकाळच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे तूर पिकावर किडरोगाचे प्रमाण दिसायला लागले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रासायनिक औषध फवारणीचे काम शेतकºयांनी हाती घेतले आहे.