रांगेत अडीच तास घालविले; नंतर सांगितले लसीचा केवळ दुसरा डोस मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 10:55 IST2021-06-28T10:54:24+5:302021-06-28T10:55:16+5:30
Corona Vaccine : अडीच तास रांगेत लागलेल्या नागरिकांना नियोजनशून्य कारभारामुळे खाली हात परतावे लागले.

रांगेत अडीच तास घालविले; नंतर सांगितले लसीचा केवळ दुसरा डोस मिळेल
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीचा पहिला डोस घेण्यासाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील केंद्रात सोमवार, २८ जून रोजी सकाळी ६ वाजतापासूनच नागरिक रांगेत लागले. ८.३० वाजता आलेल्या कर्मचाऱ्याने आज केवळ दुसरा डोसच मिळणार असल्याचे सांगितल्याने अडीच तास रांगेत लागलेल्या नागरिकांना नियोजनशून्य कारभारामुळे खाली हात परतावे लागले.
वाशीम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी शेकडो नागरीकांनी आज ( सोमवारी ) सकाळी ६ वाजेपासून रांग लावली होती. सूचना फलकावर कुठलीच सूचना नसल्याने आलेले सर्व नागरिक कर्मचाऱ्याची प्रतीक्षा करीत होते. सकाळी ८.३० वाजता एक कर्मचारी आला आणि आज फक्त कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज आहे, असे सांगितले. एवढा वेळ रांगेमध्ये लागून काय उपयोग ? असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्यामुळे सर्वांचाच पारा चढला, तुम्ही काल रात्रीच सूचना का लावली नाही, असा जाब विचारत लोक आक्रमक झाले होते. शेवटी सर्वांनाच खाली हात परत जावे लागले. यामुळे जिल्ह्याच्या प्रमुख लसीकरण केंद्रावरील नियोजन शुन्य कारभार दिसून आला. याची वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.