शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव नगर पंचायत निर्मितीच्या हालचालींना वेग

By admin | Updated: February 12, 2015 00:51 IST

कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम होऊ शकतो जाहीर.

मालेगाव (वाशिम) : ग्रां.प. मालेगावला नगर पंचायतचा दर्जा देऊन त्या ठिकाणी नगर पंचायत निर्मितीच्या हालचालींना आता वेग आला असून, नगर पंचायत निर्मितीची घोषणा यापूर्वीचे केली होती; मात्र त्यानंतर नवीन सरकार आले व ही प्रक्रिया रेंगाळली होती; मात्र आता या प्रक्रियेला चांगलाच वेग आला असून, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व नगररचना विभागाने यासाठी इत्यंभूत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविली आहे. याबाबत अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र झेड. पी.बी. २0१४/ प्र.क.७८/ पंरा.५ ग्रामविकास व जलसंधारण विभाग १४ जानेवारी २0१५ च्या परिपत्रकानुसार या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना नोटिसा पाठविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. क कक्ष १२ /क.ल./न.पा.प्र./ कावि/३३/ २0१५ नुसार मालेगाव हद्दीतील जिल्हा परिषद सदस्य चंदू उत्तम जाधव, पंचायत समिती सदस्य बबन नामदेव चोपडे, पंचायत समिती सदस्य सुमनबाई भीमराव गुडदे यांना ३१ जानेवारीला या बाबत म्हणणे मांडण्यासाठीसुद्धा बोलावले होते. विशेष म्हणजे ज्या दिवशी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर पत्रात असे नमूद करण्यात आले की, शासनाकडून आलेल्या पत्रानुसार वाशिम जिल्हय़ातील मालेगाव या तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याबाबत धोरण निश्‍चित केले असून, त्यानुसार मालेगाव ग्रा.प.ला नगर पंचायत दर्जा देताना जिल्हा परिषद मालेगाव गटाचे सर्व क्षेत्र प्रस्तावित नगर पंचायतीत समाविष्ट होत आहे. पंचायत समिती ५७ मालेगाव व ५८ मालेगाव मतदार गणाचे क्षेत्र मालेगाव नगर पंचायतीत समाविष्ट होत असल्याने त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या संबंधित सदस्यांचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ चे कलम २५५ व २५७ अन्वये रद्द होणार आहे. या संबंधित अहवाल अवर सचिव ग्रामविकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन २५, आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन अमरावती, तहसीलदार मालेगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. मालेगाव ग्रा.पं.ची प्रभाग रचना तयार झाली असून, दुसरीकडे अचानक नगर पंचायत निर्मिती अंतिम टप्प्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.