शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन क्षेत्रात गंधक, सुक्ष्मअन्नद्रव्य वाढीवर भर

By admin | Updated: October 10, 2014 00:27 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विदर्भात शेती शाळा.

अकोला : विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून, या क्षेत्रातील गंधक, सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत आहे. ही एक धोक्यांची घंटा असल्याने, या घटकांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विदर्भात शेती शाळा कार्यक्रम राबवून, शेतकर्‍यांना माहिती देण्यात येत आहे. शेतीतील गंधक व दुय्यम सुक्ष्म अन्नद्रव्ये घटत असल्याने कृषी विद्यापीठाने याचा गांर्भियाने विचार सुरू केला असून, विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायन विभागातंर्गत अखिल भारतीय समन्वयीत सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्पाच्यावतीने विदर्भात शेती शाळांचे आयोजन करू न शेतकर्‍यांना या धोक्यापासून अवगत करण्यात येत आहे. गंधक व सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पीके, प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या घटकांची जमिनीतील घसरण थांबवणे आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रीय खतासोबतच, संतुलीत खताचा वापर यापुढे करावा लागणार आहे. कृषी विद्यापीठाने आदिवासी भागासह, विदर्भातील प्रत्येक जिल्हयात शेती शाळा कार्यक्रम सुरू केले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यासाठी जनजागृती सुरू आहे. असे असले तरी शेतीतील गंधक, दुय्यम अन्नद्रव्याचे संतुलन राखणे कठीणच होत चालले आहे. यासाठीचे मार्गदर्शन या शेती शाळांमधून करण्यात येत असले तरी, भरघोस पण कमी खर्चात उत्पादन काढण्याच्या मागे लागलेल्या शेतकर्‍यांना समजावून सांगण्यात विद्यापीठ किती यशस्वी होते, हे येणारा काळच सांगणार आहे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, सामाजिक संघटनांना सामुहिक चळवळ राबवावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कृषी विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञ डॉ. नितीन कोंडे यांनी शेतातील गंधक व सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पीक उत्पादनात घट होत असून शेतीतील या घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेती शाळा व इतर माध्यमातून शेतकर्‍यांची जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.