वाशिम बाजार समितीत सोयाबीनचा दर पोहोचला ३१०० रुपयांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:10 IST2017-12-28T16:06:29+5:302017-12-28T16:10:45+5:30
वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे.

वाशिम बाजार समितीत सोयाबीनचा दर पोहोचला ३१०० रुपयांवर !
वाशिम : गत काही दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सोयाबीनचे दर २९०० ते ३१०० रुपयांदरम्यान राहिल्याने बाजारातील चढउतार शेतकरी अनुभवत आहेत. सोयाबीनच्या दरातील वाढ मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे.
वाशिम जिल्ह्यात यावर्षी पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. अपुºया पावसामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अनेक शेतकºयांना सोयाबीनवर केलेला खर्चही वसुल झाला नाही. त्यातच सुरुवातीला बाजारात १५०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण होते. शासनाने नाफेडसाठी सोयाबीन खरेदी सुरू केली असली तरी, त्या ठिकाणी लावण्यात येणारे जाचक निकष पाहता व्यापारी आणि नाफेडच्या खरेदीत फारसा फरक शेतकऱ्यांना अनुभवयास मिळाला नाही. नाफेडच्या केंद्रावर सोयाबीन चाळणी करून आणि ओलावा तपासून खरेदी करण्यात येते तर बाजार समितीत व्यापारी माल पाहून लिलावात बोली बोलतात. १०-१५ दिवसांपासून बाजार समितीत सोयाबीनला ३ हजार रुपये भाव मिळत आहे.
त्यामुळे नाफेडकडे शेतकरी आता पाठ फिरवित असल्याचे दिसून येते. गुरुवारी वाशिम बाजार समितीत सोयाबीनचे दर ३१०० रुपयांपर्यंत पोहचले होते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी यापूर्वीच सोयाबीन विकले आहे. आता मध्यम व मोठे शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत असल्याचे दिसून येते. सोयाबीनच्या दरातील वाढ व्यापाऱ्यांसाठी आता फायदेशीर ठरेल, असे बोलले जाते.