Solapur: घरगुती वादातून पुतण्याने केली काकाची हत्या, मेडशी येथील घटना

By सुनील काकडे | Updated: May 5, 2023 14:50 IST2023-05-05T14:49:50+5:302023-05-05T14:50:15+5:30

Solapur: वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे घरगुती वादातून पुतण्याने काकावर कुऱ्हाडीचे वार करून त्यांची हत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

Solapur: Nephew kills uncle over domestic dispute, incident at Medshi | Solapur: घरगुती वादातून पुतण्याने केली काकाची हत्या, मेडशी येथील घटना

Solapur: घरगुती वादातून पुतण्याने केली काकाची हत्या, मेडशी येथील घटना

- सुनील काकडे 
वाशिम : जिल्ह्यातील मेडशी येथे घरगुती वादातून पुतण्याने काकावर कुऱ्हाडीचे वार करून त्यांची हत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. मृतकाच्या मुलाच्या फिर्यादीवरून आरोपी रत्नदीप तायडे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार, धर्माजी तायडे आणि रत्नदीप तायडे हे सख्ये काका-पुतण्या असून दोघांची घरे लागून आहेत. घराजवळ असलेली टीनपत्रे काढून घेण्यावरून दोघात गुरुवारी सकाळी वाद झाला. त्याचा राग रत्नदिपने मनात बाळगून काकाचा काटा काढण्याची खूणगाठ मनाशी बांधली. दरम्यान, दुपारी दोन वाजेच्या सुमारास धर्माजी तायडे हे आपल्या शेतात जात असताना रत्नदिपने हाती कुऱ्हाड घेऊन रस्त्यात त्यांना गाठले. दोघांमध्ये यावेळी जोरदार भांडण होऊन रत्नदिपने धर्माजी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात धर्माजी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मृताचा मुलगा पुरुषोत्तम तायडे याने मेडशी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी रत्नदीप तायडे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: Solapur: Nephew kills uncle over domestic dispute, incident at Medshi

टॅग्स :washimवाशिम