संपावर गेलेल्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा
By Admin | Updated: July 14, 2014 23:35 IST2014-07-14T23:35:40+5:302014-07-14T23:35:40+5:30
गटविकास अधिकारी यांनी बेमुदत संपावर गेलेल्या सर्व ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

संपावर गेलेल्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा
मंगरूळपीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी बेमुदत संपावर गेलेल्या सर्व ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.कर्तव्यावर रूजु न झाल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम १९६४ नुसार कार्यवाही करण्याची तसदी सुध्दा दिली आहे.ग्रामसेवकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की दि ३0 जुन पासुन संघटनेच्या काम बंद आंदोलनात आपण सहभागी झाले आहात प्रशासकीय कामकाजाचे दृष्टीने ही बाब कर्तव्यात कसुर करणारी आहे सद्यस्थितीत अत्यंत महत्वाचे कामे पाणी टंचाई,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना,ब्लिचींग पावडर,कृषी विषयक योजना,ऑन लाईन जन्म मृत्युच्या नोंदी इत्यादी योजनेची कामे बंद पडलेली आहे.आपण आपल्या कर्तव्यावर उपस्थित नसल्यामुळे प्रशासकीय कामात अडचणी निर्माण झाल्याचे नमुद करण्यात आले आहे