शॉकसर्किटने आग लागून दोन गोठे व वैरण जळून खाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:13 IST2019-03-31T15:13:23+5:302019-03-31T15:13:28+5:30
शिरपूर जैन ( वाशिम) - वसारी ता. मालेगाव येथे ३१ मार्च च्या दुपारी १२ वाजता शाँर्टसर्किट होऊन दोन गोठे व पाच जणांची वैरण जळून खाक झाल्याची घटना घडली.

शॉकसर्किटने आग लागून दोन गोठे व वैरण जळून खाक !
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन ( वाशिम) - वसारी ता. मालेगाव येथे ३१ मार्च च्या दुपारी १२ वाजता शाँर्टसर्किट होऊन दोन गोठे व पाच जणांची वैरण जळून खाक झाल्याची घटना घडली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वसारी येथे ३१ मार्चला दुपारी १२ वाजता वीज वाहिनीची शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये विठ्ठल नामाजी जाधव यांच्या शेतातील गोठा, वैरण सह ट्रॅक्टर व जेसीबी चे साहित्य जळून खाक झाले. वसंता कढणे यांचाही गोठा व वैरण पूर्णता जळाली. प्रल्हाद जाधव, दामोदर जाधव, गजानन जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील वैरण, लाकुड फाटा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आग विझविणण्यासाठी रिसोड व वाशिम नगर परिषदचे अग्नि बंबाची मदत घेण्यात आली होती. तसेच आग विझविण्यासाठी मालेगाव ते रिसोड रस्ता कामात वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची ही मदत घेण्यात आली. घटनास्थळी शिरपूर पोलीस संबंधित ग्रामसेवक व तलाठी यांनी भेट दिली. या घटनेमध्ये एकूण तीन लाख रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपस्थितांकडून मिळाली आहे.