शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वीज प्रश्नावर शिवसैनिक आक्रमक!

By admin | Updated: November 1, 2016 00:00 IST

नादुरूस्त रोहित्रामुळे शेतकरी त्रस्त असून, त्यांनी महावितरणकडे उपकेंद्रांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

रिसोड, दि. ३१- वीज प्रश्न तातडीने निकाली काढा; अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा पदाधिकार्‍यांनी सोमवारी घेतला. खासदार भावना गवळी यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालय परिसरात महावितरणच्या अधिकार्‍यांनी शिवसैनिक व शेतकर्‍यांशी संवाद साधला.शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम लक्षात घेता वीजपुरवठय़ाच्या मागण्या तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी आक्रमक होत महावितरणच्या अधिकार्‍यांना यावेळी धारेवर धरले. जळालेले विद्युत रोहित्र तातडीने बदलून द्यावे, कोटेशन भरलेल्या शेतकर्‍यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी, मंजूर झालेल्या नवीन रोहित्राचे काम तातडीने पूर्ण करावे, लोडशेडींगच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करू नये, कृषीपंपांना लागणारा विजेचा दाब कमी-जास्त प्रमाणात ठेवू नये आदी मागण्या शिवसेनेच्यावतीने यापूर्वीच महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केल्या होत्या. या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी दिला होता. याची दखल घेत महावितरणच्या अधिकार्‍यांनी सोमवारी शिवसैनिक व शेतकर्‍यांशी चर्चा केली.महावितरणचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी चर्चा करताना उपरोक्त मागण्या निकाली काढण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही यावेळी दिली. मेश्राम यांच्या लेखी आश्‍वासनामुळे १ नोव्हेंबरचे आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचे आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दिलेल्या आश्‍वासनानुसार विजेची कामे झाली नाहीत तर शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महादेवराव ठाकरे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, उपजिल्हाप्रमुख भागवतराव गवळी, शहर प्रमुख अरूण मगर, अँड. गजानन अवताडे, उपतालुका प्रमुख शिवाजीराव खानझोडे, शिवाजीराव अवताडे, राजेंद्र बोडखे, रंगराव खडसे, मदन ढोले, पंजाबराव शिंदे, जगन्नाथ बिल्लारी, प्रकाश चोपडे, गजानन सानप, सतीश धोटे, मधुकरराव साबळे, बळीराम चोपडे, इढोळे यांच्यासह शेकडो शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती. वीजपुरवठय़ाची समस्या कायम राहिली तर आंदोलनाचा इशारा दिला.