शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे -  रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:22 IST

मागील पावणे दोन महिन्यापासून राज्यात पाऊस  नसल्याने पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन,  मुग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्‍यांच्या हातातील  गेलेले आहे. तर कापसाचे उत्पादन निम्म्यावर येवुन ठे पले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  अशा परिस्थितीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे,मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन शे तकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न  सुरु आहे असे सांगत शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे विदर्भ  संपर्क नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी  केले.

ठळक मुद्देवाशिम येथे शिवसेनेचा मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील पावणे दोन महिन्यापासून राज्यात पाऊस  नसल्याने पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन,  मुग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्‍यांच्या हातातील  गेलेले आहे. तर कापसाचे उत्पादन निम्म्यावर येवुन ठे पले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  अशा परिस्थितीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे,मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन शे तकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न  सुरु आहे असे सांगत शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे विदर्भ  संपर्क नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी  केले.स्थानिक परशुराम भवन येथे गुरुवार ७ सप्टेंबर रोजी  जिल्हा शिवसेनेच्यावतीने आजीमाजी पदाधिकारी व  शिवसैनिकांसाठी  मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात  आला होता. याप्रसंगी नामदार रावते प्रमुख मार्गदर्शक  म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री  संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार श्रीकांत  देशपांडे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष  अशोक हेडा, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, माजी जिल्हा  प्रमुख डॉ.सुधीर कव्हर,  पंजाबराव झनक, उपजिल्हा  प्रमुख माणिक देशमुख, जि.प.सभापती विश्‍वनाथ सान प, डॉ.सुभाष राठोड, नगरसेवक अँड.विशाल  खंडेलवाल, राजु भांदुर्गे, अतुल वाटाणे, निलेश  पेंढारकर, तालुका प्रमुख गजानन भांदुर्गे, तालुका प्रमुख  विवेक नाकाडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी ना.रावते पुढे म्हणाले की, हिंदु हृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेवुन हातात  शिवबंधन घातलेल्या शिवसैनिकांनी ग्रामीण पातळीवर  घराघरात शिवसेना पोहोचविण्यासाठी झटले पाहिजे. या प्रसंगी रावते यांनी आगामी सोमवार ११ सप्टेंबर रोजी सं पूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिक  राज्यव्यापी भव्य मोर्चा काढुन नवरात्रीमध्ये शेतकर्‍यांना  कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी शासनाकडे करीत  असल्याचे माहिती दिली. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या  मार्गदर्शनपर भाषणात वाशिम जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गट  तट अथवा मतभेद नसल्याचे स्पष्ट करीत शिवसैनिकांनी  संघटीतपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तर खासदार  भावना गवळी यांनी कमी बोलणे व जास्त काम करणे  यावर आपला भर असुन दोन्ही जिल्ह्यातील  शिवसैनिकांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले.  शिवसेना वाढीसाठी आपण पोटतिडकीने काम करणार  असल्याचे सांगत जाहीरातीमध्ये आपला फोटो न  टाकणार्‍या तसेच मुद्दामुन लहान किंवा मोठे फोटो  टाकणार्‍यांना खडेबोल सुनावले. यामुळे आपल्यावर  कुठलाही परिणाम होणार नसुन आपण एकनिष्ठतेने  काम करीत राहु असे म्हटले. शिवसैनिक मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा  प्रमुख राजेश पाटील , शिव आरोग्य सेना प्रदेश  कार्यकारिणी सदस्य डॉ. श्याम  जाधव यांच्यासह हरिष  सारडा, सुरेश कदम, रमेश घुगे, दिनेश राठोड, माजी  जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुभाष राठोड, नागोराव ठेंगडे,  दिलीप काष्टे , रवि पाटील, नितीन मडके, उमेश मोहळे,  गणेश गाभणे, राजाभैय्या पवार, गणेश ठाकरे, आदिंनी  परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रमुख राजेश पाटील तर  संचालन व आभार प्रदर्शन हरिष सारडा यानी केले.याप्रसंगी कैलास गोरे, सुरेश मापारी, किरण धामणे, बंडु  शिंदे, विशाल खंडेलवाल, संजय जोशी, सुरज इंगळे  आदिसह शिवसेनेचे जिल्ह्यातील आजीमाजी पदाधिकारी  जि.प. व पं.स.पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठय़ा सं ख्येने उपस्थित होते.