वाशिम येथे बंडखोरांविरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा; शिवाजी चौकात निदर्शने, हजारो शिवसैनिकांचा सहभाग

By दादाराव गायकवाड | Updated: September 25, 2022 21:36 IST2022-09-25T21:36:46+5:302022-09-25T21:36:57+5:30

शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून शिवसेनेच्यावतीने मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

Shiv Sena protest march against rebels at Washim; Demonstrations at Shivaji Chowk, participation of thousands of Shiv Sainiks | वाशिम येथे बंडखोरांविरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा; शिवाजी चौकात निदर्शने, हजारो शिवसैनिकांचा सहभाग

वाशिम येथे बंडखोरांविरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा; शिवाजी चौकात निदर्शने, हजारो शिवसैनिकांचा सहभाग

वाशिम: शिवसेनावाशिम जिल्ह्याच्यावतीने पक्षाशी बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्यांच्या निषेधार्थ रविवार 26 सप्टेंबर रोजी वाशिम येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात बंडखोरांविराेधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून शिवसेनेच्यावतीने मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बंडखोर नेत्यांच्या प्रतिमेला काळे फासून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

या मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, शिवसेना पश्चिम विदर्भ सचिव सागर देशमुख, वाशिम जिल्हा विस्तारक कामेश जाधव, माजी जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कव्हर, माजी जिल्हा प्रमुख राजेश पाटील, मंगरुळपीर तालुका प्रमुख विवेक नाकाडे, मंगरुळपीर शहरप्रमुख सचिन परळीकर आदिंसह जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 

Web Title: Shiv Sena protest march against rebels at Washim; Demonstrations at Shivaji Chowk, participation of thousands of Shiv Sainiks