शिरपूर पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावला मोबाईल चोराचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 15:11 IST2018-03-01T15:11:33+5:302018-03-01T15:11:33+5:30
पोलीसांनी ताबडतोब तपास करुन या प्रकरणातील आरोपी सुमेध अशोक सावळे रा. पार्डी तिखे यास पोलीसांनी अवघ्या १२ तासात मोबाईलसह ताब्यात घेतले.

शिरपूर पोलिसांनी अवघ्या बारा तासात लावला मोबाईल चोराचा छडा
शिरपूर : बेलखेडा फाटयावर एका अनोळखी इसमाने मोटारसायकल थांबवून, चाकुचा धाक दाखवून ३२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल पळविल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री दरम्यान घडली. यासंदर्भात १ मार्च रोजी जोंधनखेडा जि. जळगाव येथील मुक्तार दिलावर पठाण यांनी पोलिसात तक्रार दिली . त्यावरुन पोलीसांनी ताबडतोब तपास करुन या प्रकरणातील आरोपी सुमेध अशोक सावळे रा. पार्डी तिखे यास पोलीसांनी अवघ्या १२ तासात मोबाईलसह ताब्यात घेतले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्तार दिलावर पठाण मोटारसायकलवर ग्राम भगवती ता. सेनगाव येथून देवूळगाव साखरशा येथे जात असतांना बेलखेड फाटयावर एका अनोळखी इसमाने चाकुचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला. पठाण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चाकू हातावर मारण्याचा प्रयत्न केला. तो वार वाचवितांना मोटारसायकलचे नुकसान झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार भादवीचे कलम ३९२, ३४१, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला.