मुदतीनंतरही सातबारा पुनर्शोधन अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 20:29 IST2017-08-20T20:29:17+5:302017-08-20T20:29:47+5:30
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.

मुदतीनंतरही सातबारा पुनर्शोधन अपूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमिअभिलेख आधुनिकीकरण प्रक्रि येत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी, १५ आॅगस्टच्या निर्धारित मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाला काम पूर्ण करता आले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८०९ पैकी ७५० गावातील साताबारा पुनर्शोधन पूर्ण झाले आहे, तर ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्रही तयार झाले आहे.
शासनाने संगणकीकरणावर भर दिल्यानंतर सर्वच दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बाराचेही संगणकीकरण करण्यात आले. शेतकºयांना अद्ययावत सातबारा मिळावा, गट क्रमांकामधील क्षेत्रांसंदर्भात असलेले आक्षेप दूर व्हावे या उद्देशाने सातबारा संगणकीकरण प्रक्रिया राज्यभरात झ्रपाट्याने पूर्ण करण्यात आली; परंतु त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबार री-एडिट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर सातबारा चावडी वाचन प्रक्रिया राबवून त्यामध्ये क्षत्र न जुळत असलेल्या गटक्रमांकासह, इतर तांत्रिक अडचणींबाबत शेतकºयांचे आक्षेप नोंदवून घेण्यात आले. ही प्रकिया १५ जुलैपूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शेतकºयांच्या आक्षेपानुसार आणि लेखी सातबाराचे निरीक्षण करून तहसील स्तरावर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर उर्वरित दुरुस्तीचे काम करून पुन्हा सातबारा री-एडिट प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. यासाठी शासनाकडून १५ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती. तथापि, १९ आॅगस्टपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ७५० गावांतील सातबारा पुनर्शोधन पूर्ण झाले असून, ५३० गावांचे अंतिम प्रमाणपत्र तयार झाले आहे. दरम्यान, काम पूर्ण झाले नसले तरी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे राज्याच्या महसूल व वनविभागाच्यावतीने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी सागर हवालदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.