अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळविले; आरोपीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 17:49 IST2019-07-28T17:48:52+5:302019-07-28T17:49:31+5:30
मानोरा : तालुक्यातील चोंढी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीला एका आरोपीने लग्नाचे आमिष दाखवुन पळुन नेल्याची घटना २६ जुलै रोजी उघडकीस आली.

अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळविले; आरोपीवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील चोंढी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीला एका आरोपीने लग्नाचे आमिष दाखवुन पळुन नेल्याची घटना २६ जुलै रोजी उघडकीस आली. पिडीत मुलीच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी २७ जुलै रोजी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलीच्या वडीलाने मानोरा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, २६ जुुुुलै रोजी मानोरा येथील एका विद्यालयात जाते, असे सांगुन त्यांची मुलगी घरून निघून गेली. शाळा सुटल्यानंतर बराच वेळानंतर मुलगी घरी परत आली नाही. अन्यत्र विचारपूस केली असता व शोध घेतला असता ती आढळून आली नाही. तिला गावातीलच आरोपी रमेश वासुदेव राठोड याने लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेल्याची तक्रार पिडीत मुलीच्या वडीलाने दिली. सदर मुलगी १७ वर्षीय असल्यामुळे मानोरा पोलिसांनी फुस लावुन नेल्याप्रकरणी आरोपी रमेश वासुदेव राठोडविरुध्द कलम ३६३ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईक करीत आहेत.