शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचे वर्ग बंद; शैक्षणिक शुल्क सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 17:19 IST

Washim News, Education Sector शुल्क आकारू नये अशी मागणी पालकांमधून होत आहे.

वाशिम : कोरोनामुळे अद्याप शाळेचे वर्ग सुरू झाले नाहीत; दुसरीकडे मात्र शैक्षणिक शुल्कामध्ये संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय आदीचा समावेश केला जात असल्याने पालकांना भुर्दंड बसत आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, असा सूर पालकांमधून उमटत आहे.देशात साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळेचे वर्ग अद्याप विद्यार्थ्यांसाठी खुले झाले नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी आॅनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू केलेली आहे. शाळेचे वर्ग बंद असल्याने साहजिकच संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयदेखील बंदच आहे. त्यामुळे यावर्षी शैक्षणिक शुल्कामधून संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय या बाबींना वगळण्यात यावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे. परंतू, पालकांची मागणी धुडकावून लावत बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्व शैक्षणिक शुल्क भरावे, असे संदेश पालकांच्या मोबाईलवर पाठविण्याचा सपाटा लावला आहे. शैक्षणिक शुल्काचा भरणा न केल्यास आॅनलाईन पद्धतीने होणाºया प्रथम सत्र परीक्षेला बसण्यास विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असाही इशारा काही शाळांनी दिल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आॅनलाईन पद्धतीच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंदर्भात शैक्षणिक शुल्काची आकारणी करावी, संगणक, प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे शुल्क आकारू नये अशी मागणी पालकांमधून होत आहे. यावर्षी वर्ग बंद असल्याने संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय बंदच आहेत. त्यामुळे या तीन बाबींची शुल्क आकारणी करू नये. याचा भुर्दंड पालकांना बसणार नाही.विशाल देबाजेपालक, वाशिम 

संगणक, ग्रंथालय बंद असल्याने त्या शुल्काचा समावेश एकूण शुल्कामध्ये करण्यात येऊ नये, अशा सूचना शाळांना दिल्या जातील.अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र