वन्यजीवप्रेमींच्या सतर्कतेमुळे वाचला जखमी मोराचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 16:35 IST2019-11-24T16:34:54+5:302019-11-24T16:35:30+5:30
वन्यजीव प्रेमींना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच वनविभागाशी संपर्क साधल्याने या मोराचा जीव वाचू शकला.

वन्यजीवप्रेमींच्या सतर्कतेमुळे वाचला जखमी मोराचा जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सनगाव येथे रविवारी सकाळी समाधान चंपत भगत यांच्या शेतात राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत आढळून आला. वन्यजीव प्रेमींना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच वनविभागाशी संपर्क साधल्याने या मोराचा जीव वाचू शकला.
सनगाव येथील शेतकरी समाधान चंपत भगत यांना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांनी या संदर्भात वन्यजीवपे्रमी सतिश भगत, प्रदीप सोनुने, ऊजेश भगत विशाल भगत, बाळू भगत यांना माहिती दिली. त्यावरून या वन्यजीवप्रेमींनी घटनास्थळावर पोहोचत मोराला ताब्यात घेत वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांना ही माहिती दिली. गौरवकुमार इंगळे यांनी वनविभागाशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वनरक्षक पोले आणि त्यांचे सहकारी भगत यांनी हा मोर ताब्यात घेऊन उपचारासाठी पशूवैद्यकीय दवाखान्यात नेला. त्यामुळे मोराचा जीव वाचविणे शक्य झाले.