वाशिम जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच शिर्डीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 17:03 IST2019-07-30T17:02:55+5:302019-07-30T17:03:09+5:30
मानोरा (वाशिम) : महाराष्ट्र शासन व सरपंच परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे ३१ जुलै रोजी राज्यस्तरीय सरपंच परिषद होत आहे

वाशिम जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच शिर्डीकडे रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : महाराष्ट्र शासन व सरपंच परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे ३१ जुलै रोजी राज्यस्तरीय सरपंच परिषद होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधून सरपंच, उपसरपंच ३० जुलै रोजी रवाना झाले आहेत.
शिर्डी येथे आयोजित सरपंच परिषद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. या परिषदेत सहभागी होणाºया सरपंचांना ग्रामीण विकासासंबंधीची भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय गावपातळीवर शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना येणाºया अडचणी, जाणवणाºया समस्यांबाबत उहापोह होणार आहे. दरम्यान, सरपंच परिषदेसाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून सरपंच, उपसरपंच वाहनांनी ३० जुलै रोजी रवाना झाले.