मानाेरा बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे संजय रोठे

By नंदकिशोर नारे | Updated: May 22, 2023 13:15 IST2023-05-22T13:15:13+5:302023-05-22T13:15:56+5:30

सभापती आणि उपसभापती पदासाठी केवळ दोनच अर्ज आले होते . त्यामुळे ही निवड अविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी परेश गुल्हाणे यांनी केली.

Sanjay Rothe of Mahavikas Aghadi as Chairman of Manera Bazar Committee | मानाेरा बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे संजय रोठे

मानाेरा बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे संजय रोठे

वाशिम - मानाेरा बाजार समितीचे सभापती पदाची निवडणूक  २२ मे राेजी अविरोध झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे डॉ संजय रोठे तर उप सभापतीपदी भुजंगराव राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.

सभापती आणि उपसभापती पदासाठी केवळ दोनच अर्ज आले होते . त्यामुळे ही निवड अविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी परेश गुल्हाणे यांनी केली. या वेळी महाविकास आघाडीचे नेते जि. प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे ,माजी वीज मंडळ सदस्य तथा उद्धव ठाकरे शिवसेना नेते अनिल राठोड, यांचेसह काँग्रेस,राष्ट्रवादी काँगेस,उद्धव ठाकरे शिवसेनाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,आणि सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवड झाल्यानंतर सभा झाली.  या सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल राठोड होते. यावेळी चंद्रकांत ठाकरे , रवि पवार, डॉ.शाम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण अनिल राठोड यांनी केले.

Web Title: Sanjay Rothe of Mahavikas Aghadi as Chairman of Manera Bazar Committee

टॅग्स :washimवाशिम