गाव समृध्दीसाठी घाेटा येथील इंगाेले दाम्पत्यांची अशीही धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:19+5:302021-03-06T04:39:19+5:30

घाेटा येथील उच्चशिक्षित असलेले अण्णा इंगाेले यांची जेमतेम परिस्थिती, त्यातही पायाचे ऑपरेशन करायचे असल्याने जड काम करणे शक्य नाही. ...

The same struggle of the Ingale couple at Ghaeta for the prosperity of the village | गाव समृध्दीसाठी घाेटा येथील इंगाेले दाम्पत्यांची अशीही धडपड

गाव समृध्दीसाठी घाेटा येथील इंगाेले दाम्पत्यांची अशीही धडपड

Next

घाेटा येथील उच्चशिक्षित असलेले अण्णा इंगाेले यांची जेमतेम परिस्थिती, त्यातही पायाचे ऑपरेशन करायचे असल्याने जड काम करणे शक्य नाही. असे असतानासुध्दा पत्नीसह गाव समृध्दीसाठी धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे. हंगामनिहाय विहीर, बोअर गणना सर्वेक्षण अण्णा करीत असून त्यांना त्यांच्या पत्नी साथ देत आहे. आपल्या गावाला समृध्द करण्याचा भार अण्णा इंगाेले यांनी घेतला. त्यांच्या पत्नी इंगोलेताई या पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहत आहेत. त्या आपल्या पतीच्या बरोबरीने काम करत आहेत. सोबतच आपल्या पतीने जबाबदारीने घेतलेल्या हंगामनिहाय विहीर , बोअर गणना सर्वेक्षणमध्ये आपल्या शेतातील, घरातील काम सांभाळून सहकार्य करीत आहेत. या पती, पत्नीची जिद्द ही महाराष्ट्रातील अनेक गावांना प्रेरणा देणारी ठरत असल्याचे बाेलल्या जात आहे.

..............

शेतातील माती वाहून जाऊ नये, याकरिता शेताच्या कडेला दगडाच्या रांगा

समृध्द गाव स्पर्धेतर्गंत मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा येथील एका शेतकऱ्याने शेतातील माती वाहून जाऊ नये, पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता शेतीच्या कडेला दगडाच्या रांगा लावून ठेवल्या आहेत. या शेतात भुईमूग पीक बहरलेले दिसून येत आहे.

Web Title: The same struggle of the Ingale couple at Ghaeta for the prosperity of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.