सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शेतमालाची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:25 PM2020-04-15T17:25:21+5:302020-04-15T17:25:41+5:30

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती १५ एप्रिलपासून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली.

Sale of commodities in compliance with social distance! | सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शेतमालाची विक्री!

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शेतमालाची विक्री!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके व सचिव निलेश भाकरे यांनी पुढाकार घेऊन १४ एप्रिल रोजी व्यापारी व अडत्यांची सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचे पालनाबात चर्चा करण्यात आली. त्यानुसार कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती १५ एप्रिलपासून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली.
बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतत पालन व्हावे याकरिता बाजार समितीच्या आवारात आईलपेंटने गोल आखून शेतकº्यांचा धान्य माल घेण्यास सुरुवात झाल्याने शेतकº्यांना दिलासा मिळाला.
कारंजा बाजार समिती ही आशिया खंडातील महत्वाची समजली जाते. देशात लॉकडाउन जरी असले तरी ग्रामीण भागातील शेतीचे कामे थांबलेली नाही. शेतीची उन्हाळी कामे करणे गरजेचे आहे. शेतीचे कामे करण्यासाठी येणाºया खचार्साठी पैश्याची गरज शेतकºयांना असल्याने पैसा कुठून आणायचा या विवंचनेत शेतकरी होता. बाजार समिती सुरू झाल्याने शेतीवर आर्थिक व्यवहार अवलंबून असणाºया शेतकºयांना दिलासा मिळाला. बाजार समिती सभापती प्रकाश डहाके, उपसभापती डॉ अशोक मुंदे व सचिव निलेश भाकरे तसेच संचालक मंडळींनी शेतकºयांनी माल कधी विकण्यास आणायचा या बाबत दोन कर्मचाºयांचे फोन नंबर व नाव शेतकºयांपर्यत पोहचविण्यात आले आहे. त्यानुसार एका दिवशी एकाच वाणाचा लिलाव होणार आहे. यामध्ये सोमवारी व गुरुवार तूर, मंगळवार व शुक्रवार रोजी सोयाबीन व चना तर बुधवार व शनिवार रोजी गहू या धान्य मालाचा लिलाव होणार आहे. तश्या पध्द्तीचे नियोजन करण्यात आले. तसेच जिल्हा बंदीचे आदेश लागू असल्याने इतर जिल्ह्यातील मालाची नोंद होणार नसल्याची माहिती कारंजा बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांनी दिली. ऐन अडचणीच्या तोंडावर बाजार समिती सुरु झाल्याने शेतकºयांच्या अनेक अडचणी दूर झाल्याचे शेतकºयांत बोलल्या जात आहे.

Web Title: Sale of commodities in compliance with social distance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.