शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्यांसाठी शेतक-यांची धावपळ

By admin | Updated: May 12, 2015 01:21 IST

खरीप हंगाम नियोजन ; उगवण क्षमता तपासून घरगुती बियाणे वापरा.

वाशिम : गतवर्षी झालेल्या सोयाबीन पिकांच्या नुकसानीमुळे सोयाबीन उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली. यावर्षी पेरण्यासाठी शेतकर्‍यांकडे बियाणेच नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ होत आहे. कृषी विभागाच्यावतीनेही सोयाबीनची विक्री न करता त्याची तपासणी करून बियाणे म्हणून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील अनेक शेतकरी जिल्हय़ात येवून जादा भावाने सोयाबीन विकत घेऊन जात आहेत. गतवर्षी सोयाबीन काढणीची वेळ आली असता व काहींनी काढणी करून गंजी लावलेली असताना जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन ओले झाले. काही ठिकाणी तर काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनला कोमसुद्धा फुटले होते. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. सोयाबीनच्या घटमुळे येणार्‍या खरिप हंगामात शेतकर्‍यांसमोर पेरणीसाठी बियाणे कुठून आणायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्हय़ात सोयाबीनचा तुटवडा पाहता कृषी विभागाच्यावतीने सोयाबीनची विक्री थांबवा व घरगुती सोयाबीनची तपासणी करुन जिल्हय़ातीलच शेतकर्‍यांना बियाणे म्हणून देण्याचे आवाहन केल्या जात आहे. जिल्हय़ात गतवर्षी सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी इतर जिल्हय़ाच्या तुलनेत सोयाबीन उत्पादन जिल्हय़ाचे जास्त आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी जिल्हय़ामधीलच शेतकर्‍यांना सोयाबीन बीज म्हणून दिल्यास याचा तुटवडा जाणवणार नाही; परंतु जिल्हय़ातील काही शेतकरी परजिल्हय़ात असलेल्या आपल्या नातेवाइकांना तसेच जादाभाव मिळत असल्याने परजिल्हय़ातील शेतकर्‍यांना सोयाबीनची विक्री करीत आहेत. यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मात्र सोयाबीनसाठी धावपळ करावी लागत आहे.