रस्त्यांवरील रपट्यांची अवस्था वाईट, अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:37 IST2021-02-07T04:37:38+5:302021-02-07T04:37:38+5:30

----- खड्डे झाकण्यासाठी लोखंडी पत्रे, जाळ्यांचा वापर ...

Road conditions are bad, fear of accidents | रस्त्यांवरील रपट्यांची अवस्था वाईट, अपघाताची भीती

रस्त्यांवरील रपट्यांची अवस्था वाईट, अपघाताची भीती

-----

खड्डे झाकण्यासाठी लोखंडी पत्रे, जाळ्यांचा वापर शिरपूर येथील विविध रस्त्यांवरीन रपटे फुटून त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता, या रपट्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे; परंतु ही तसदी न घेता ग्रामपंचायत प्रशासनाने रपट्याला पडलेले खड्डे झाकण्यासाठी त्यावर लोखंडी पत्रे किंवा जाळ्या टाकल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे शिरपूर ग्राम पंचायतला शासनाच्या स्वच्छता विभागाकडून जिल्हा परिषद मार्फत १.१९ कोटी रुपये सांडपाणी व्यवस्थापनासाठी मंजूर झाले आहेत. त्या निधीतून ही कामे करण्यात यावी, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Road conditions are bad, fear of accidents