शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे संक्रमणाचा धोका; रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 27, 2014 00:00 IST

वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव.

संतोष मुंढे / वाशिमजिल्हय़ात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात विशिष्ट सोयाबीन वाणाच्या पिकांवर आलेल्या पिवळ्य़ा मोझ्ॉकच्या आक्रमणाने भविष्यात बियाण्यांमध्ये त्या विशिष्ट सोयाबीनच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे. सोबतच यावेळी या धोक्याचे परिणाम काही ठिकाणीच जाणवला असला तरी विशिष्ट वाणावरच झालेले यावेळचे पिवळ्य़ा मोझ्ॉकचे आक्रमण भविष्यात मोठय़ा प्रमाणात पेरल्या जाणार्‍या पिकावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. दूबार, तिबार पेरणीने आधीच मेताकूटीस आलेल्या शेतकर्‍यांनी उशिरा का होईना कशीबशी आलेल्या पावसाच्या भरवश्यावर सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केलेल्या सोयाबीनचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकर्‍यांनी जमेल त्या पध्दतीने संगोपनही केले. परंतू सप्टेंबरच्या दूसर्‍या आठवड्यात खोडकिड, खोडसड, मुळसड यासह विशिष्ट वाणाच्या सोयाबीनवर आलेल्या मोठय़ा प्रमाणातील पिवळ्य़ा मोझ्ॉकने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले. अनेक शेतकर्‍यांनी मोठय़ा उत्पादनाच्या आशेने पेरलेले त्या विशिष्ट जातीच्या सोयाबीनचे पिक उपटून फेकण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली. जिल्ह्यातील किमान चार ते पाच टक्के शेतकर्‍यांनी जवळपास १0 ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्यादा उत्पादनाच्या आशेने , लखपती, करोडपती, श्रीमंती आदी नावाने ओळखल्या जाणार्‍या या विशिष्ट सोयाबीन वानाची कृषी विभागाने शिफारस केली नसतांनाही पेरणी केली. त्यामधील पाच ते सात हजार हेक्टरवरील सोयाबीन उपटून फेकण्याची पाळी आल्याचे मानले तरी ज्या क्षेत्रावरील लखपती, करोडपती, श्रीमंती नावाच्या सोयाबीनचे ते पिक कायम राहिले असेल, त्या पिकापासून उत्पादीत सोयाबीन संबंधीत शेतकरी बाजारात इतर सोयाबीनसोबत विक्री करण्याची शक्यता आहे. अर्थात तसे झाल्यास पिवळा मोझ्ॉकचा कायम धोका असणार्‍या संबंधित लखपती, करोडपती, श्रीमंती वानापासून उत्पादीत सोयाबीन मोठय़ा प्रमाणात पेरल्या जाणार्‍या व कृषी विभाग शेतकर्‍यांना पेरण्याची शिफारस करणार्‍या सोयाबीनमध्ये मिसळल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.