Right To Education : अंतिम मुदतीपर्यंत ७४ शाळांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 16:21 IST2021-02-15T16:21:28+5:302021-02-15T16:21:28+5:30
Right To Education: १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत असून, जिल्ह्यात ७४ शाळांनी नोंदणी केली आहे.

Right To Education : अंतिम मुदतीपर्यंत ७४ शाळांची नोंदणी
वाशिम : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीइ-राईट टू एज्युकेशन) खासगी शाळांना १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत असून, जिल्ह्यात ७४ शाळांनी नोंदणी केली आहे.
शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळावा याकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी दरवर्षी शाळा नोंदणी, आॅनलाईन अर्ज आदी प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी २१ जानेवारीपासून खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. सुरूवातीला २९ जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी अंतिम मुदत दिली होती. विहित मुदतीत बहुतांश शाळांना नोंदणी करणे शक्य झाले नसल्याने १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. गतवर्षी वाशिम जिल्ह्यात १०१ शाळांनी नोंदणी केली होती. यावर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत ७४ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये २५ टक्के कोट्यासाठी ४७७ जागा राखीव आहेत.