शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:46 PM

या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.

ठळक मुद्दे वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पाणी फाउंडेशनकडून वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेतील कामांचा आढावा घेण्यासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले. तथापि, यासाठी अत्यावश्यक असलेले आणि शासनाकडून नियुक्त जलनायक, जलप्रेमी आणि जलदूतांनाच या कार्यक्रमाची माहिती न देण्याचा अजब कारभार प्रशासनाने केल्याचे उघडकीस आले. जिल्ह्यातील ५३ गावांत समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेचा आढावा घेण्यासह संबंधित गावांतील सरपंच, गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात १८ डिसेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात स्पर्धेंतर्गत मग्रारोहयो गाव नियोजन आराखडा तयार करणे, फळबाग लागवडी व संधी, मत्स्यविकास योजनेतून उत्पादन वाढ, पशुसंवर्धन व कुरण विकास कार्यक्रमातून आर्थिक उन्नती, समृद्ध गाव स्पर्धेसाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट दाखविण्यासह सादरीकरण करणे आदी कार्यक्रमांसह मृद व जलसंधारण विषयक कामांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी तहसीलस्तरावरून गावचे सरपंच, जलनायक, जलमित्र, जलदूतांना आमंत्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.

अभ्यासकच नाहीत, तर मार्गदर्शन मिळणार कसेराज्यशासनाने वाढत्या पाणीसमस्येवर नियंत्रणासाठी राज्यस्तर ते गावस्तरावर जलनायक, जलमित्र, जलदुतांची फ ळीच उभारली आहे. या मंडळीने बारीकसारीक निरीक्षणासह आवश्यक प्रशिक्षणही पूर्ण केले असून, मृद व जलसंधारणाबाबत त्यांच्या अभ्यासाचा आधार घेणे क्रमप्राप्तच आहे. तथापि, समृद्ध गाव स्पर्धेच्या सहाही निकषांत मार्गदर्शनासाठी यांची गरज असतानाही जिल्हास्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळेतून त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अभ्यासकच नाहीत, तर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन झाले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मला निवड झाल्यापासून एकही निमंत्रण नसून फक्त कागदोपत्री आमची नावे वापरली जातात. प्रशासनाचा हा पोरखेळ सुरु आहे. पाण्याच्या बाबतीत वाशिम जिल्ह्याची स्थिती कर्करोगग्रस्तासारखीा असून, उपचार मात्र खरचटल्यासारखे सुरू आहेत. तीन वर्षात प्रशासनाचा आणि गावकºयांचा पैसा-वेळ-श्रमाचा अपव्यव आणि झालेला लाभ याचा ताळेबंद तपासायला पाहिजे. मोठा घोळ उघडीस येईल. आम्हाला हे समजते म्हणून प्रशासन टाळते.-सचिन कुळकर्णी, जलदूत व जलहक्क कार्यकर्ता

जलसंधारणाचा विषय हा तांत्रिक विषय आहे, मात्र तांत्रिकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्या त्या विषयातल्या तज्ञांना आमंत्रित करण्यात येत नसल्याचे दिसते. याचे आश्चर्य वाटते. जल संधारणाच्या विषयात केवळ पाणी हा केवळ मानव केंद्रित मुद्दा बनवल्या गेला आहे; मात्र पाण्यावर केवळ मानवाचाच हक्क नसून,  मानवासकट संपूर्ण जैवविविधतेचा सुद्धा हक्क आहे या अंगाने विचार करण्याची गरज आहे.- डॉ. निलेश हेडा, पर्यावरण अभ्यासक, तथा जलनायक , अमरावती विभाग 

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा