महसूल कर्मचारी संघटनेचा २० आॅगस्टला संप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:47 IST2019-08-05T13:47:24+5:302019-08-05T13:47:56+5:30
शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.

महसूल कर्मचारी संघटनेचा २० आॅगस्टला संप !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाकडे पाठपुरावा करूनही विविध मागण्या प्रलंबित असून, याकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात वाशिम जिल्ह्यातील अधिकाधिक कर्मचारी सहभागी होणार असून, संपाची पूर्वतयारी केली जात आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी दिली.
राज्य सरकारी कर्मचाºयांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने विविध टप्प्यात आंदोलन करण्यात आले तसेच मंत्रालय कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी शासनदरबारी दाद मागूनही अद्याप ठोस कार्यवाही झाली नाही. शासनाचे कर्मचारी विरोधी धोरण व अनास्थेविरुध्द राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. या संपात जिल्ह्यातील १०० टक्के कर्मचारी सहभागी होणार असून, तालुकानिहाय द्वारसभा घेण्यात येणार आहेत, असे विशाल डुकरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकजूटीने संप करण्यासाठी सज्ज असून, या संपाला इतर सर्व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही डुकरे यांनी केला.