बांधावर खते, बियाणे उपक्रमाला कारंजा तालुक्यात उंदड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:38 PM2020-05-09T17:38:50+5:302020-05-09T17:39:02+5:30

९ मेपर्यंत तालुक्यातील ३७६७ शेतकरी गटांनी विविध खते, बियाणे आणि इतर निविष्ठांसाठी कृषी विभागाच्या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली आहे. 

The response to the fertilizer and seed initiative in Karanja taluka has been overwhelming | बांधावर खते, बियाणे उपक्रमाला कारंजा तालुक्यात उंदड प्रतिसाद

बांधावर खते, बियाणे उपक्रमाला कारंजा तालुक्यात उंदड प्रतिसाद

Next

लोकमत न्युज नेटवर्क
कारंजा (वाशिम): आगामी खरीप हंगामात शेतकºयांना शेताच्या बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला कारंजा तालुक्यात उदंड प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमांतर्गत ९ मेपर्यंत तालुक्यातील ३७६७ शेतकरी गटांनी विविध खते, बियाणे आणि इतर निविष्ठांसाठी कृषी विभागाच्या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली आहे. 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. या अंतर्गत कृषीसेवा केंद्रात खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर निविष्ठाच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या सुचनेनुसार जिल्हाभरात खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात शेतकºयांना कृषी विभागाने दिलेल्या लिंकचा आधार घेऊन आॅनलाईन नोंदणी करावी लागत आहे. या उपक्रमाला कारंजा तालुक्यात शेतकरी गटांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, ९ मे पर्यंत या तालुक्यात ३७६७ शेतकरी गटांनी विविध निविष्ठांसाठी आॅनलाईन नोंदणी केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी दिली. यात सोयाबीन बियाण्यांच्या २१९४७ बॅग, कपाशी पाकिटे ११८६४, तूर बियाणे २३३.७८ क्विंटल, उडिद, मुग बियाणे २२७६ बॅग, ज्वारी २१६ बॅग, अशी बियाण्यांची नोंदणी शेतकरी गटांनी केली, तर खतांमध्ये डीएपी खताच्या १६११० बॅग, १०:२६:२६ च्या ७४४४ बॅग, २०:२०:०:१३ च्या ११०८१ बॅग, एसएसपीच्या ४००२ बॅग, युरियाच्या ६१७० बॅग, १५:१५:१५: च्या ११८० बॅग, तसेच एमओपी खतांच्या २७५१ बॅगची नोंदणी शेतकरी गटांनी केली. 
 
८८ कृषीसेवा केंद्राच्या माध्यमातून निविष्ठा बांधावर 
कारंजा तालुक्यात नोंदणी केलेल्या ३७६७ शेतकरी गटांना त्यांनी केलेल्या  नोंदणीनुसार कारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील ८८ कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेताच्या बांधावर खते, बियाणे आणि इतर निविष्ठा पोहोचविल्या जाणार आहेत. यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या सहकाºयांनी नियोजन केले आहे. ९ मेपर्यंत तालुक्यातील ८६ कृषीसेवा केंद्रांच्या माध्यमातून ८३० शेतकºयांना घरपोस निविष्ठा पोहोचविण्यातही आल्या आहेत.

Web Title: The response to the fertilizer and seed initiative in Karanja taluka has been overwhelming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.