रानडुकराच्या कळपाची दुचाकीस धडक; एकजण गंभीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 13:12 IST2019-02-12T13:12:37+5:302019-02-12T13:12:42+5:30
इंझोरी (वाशिम) : कारंजा-मानोरा मार्गावरील दापूरा नाल्यालगत मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास रानडुकराच्या कळपाने दुचाकीस धडक दिली.

रानडुकराच्या कळपाची दुचाकीस धडक; एकजण गंभीर!
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम) : कारंजा-मानोरा मार्गावरील दापूरा नाल्यालगत मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास रानडुकराच्या कळपाने दुचाकीस धडक दिली. यात एकजण गंभीर झाला असून दुचाकीवरील दुसºयालाही दुखापत झाली.
प्राप्त माहितीनुसार, कुपटा गावानजिक असणाºया मांगकिन्ही या गावातील कैलास सिताराम ठोके (४०) आणि गोविंद प्रल्हाद ठाकरे (३०) हे दोघे दुचाकी वाहनाने कारंजा येथे जात असताना दापूरा ते इंझोरी यादरम्यान दापूरा नाल्यावर दुचाकीला रानडुकराच्या कळपाने जबर धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार खाली पडल्याने कैलास ठोके गंभीर जखमी झाले; तर गोविंदा ठाकरे यांनाही दुखापत झाली. जखमींना इंझोरी येथील आपत्कालिनचे विशाल वानखडे यांनी उपचारार्थ कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.