वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस : गहू, हरभरा पिकासह आंब्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 18:20 IST2020-03-01T18:19:56+5:302020-03-01T18:20:11+5:30
शेतात गहू सोंगणीची कामे सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस : गहू, हरभरा पिकासह आंब्याचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये रविवार, १ मार्च रोजी दुपारी ४ वाजतानंतर अवकाळी पाऊस व काहीठिकाणी गारपीट झाली. त्याचा फटका गहू आणि हरभरा या पिकांना बसण्यासोबतच आंब्याचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, काही शेतकºयांच्या शेतात गहू सोंगणीची कामे सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या सहाही तालुक्यांमधील ग्रामीण भागात रविवारी दिवसभर ढगाळी वातावरण राहिले. दुपारी ४ वाजतानंतर बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुसाट्याचा वारा सुटण्यासोबतच मैराळडोह, कामरगाव, मारसूळ, शेलूबाजार आदीठिकाणी गारपीटही झाली. त्याचा गहू आणि हरभरा या पिकांना जबर फटका बसला आहे.