शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

रिठद येथील अवैध सावकारांच्या घरांवर धाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 4:46 PM

वाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) येथील बाळकृष्ण ज्ञानबा बोरकर आणि राजाराम ज्ञानबा आरू या दोन अवैध सावकारांच्या घरांवर जिल्हा उपनिबंधकांनी गठीत केलेल्या तीन पथकांनी शनिवार, १९ जानेवारीला सकाळी धाडी टाकून झाडाझडती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) येथील बाळकृष्ण ज्ञानबा बोरकर आणि राजाराम ज्ञानबा आरू या दोन अवैध सावकारांच्या घरांवर जिल्हा उपनिबंधकांनी गठीत केलेल्या तीन पथकांनी शनिवार, १९ जानेवारीला सकाळी धाडी टाकून झाडाझडती घेतली. यात ७० पेक्षा अधिक अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त करण्यात आले. त्यात कोरे धनादेश, खरेदी खत, डायºया, वह्यांचा समावेश असल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले. जिल्ह्यात अवैध सावकारीसंदर्भात प्रशासनाला तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये अवैध सावकारीसंदर्भात कारवाईच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या असून, मिळालेल्या माहितीवरून १९ जानेवारीला सकाळी १० वाजता तीन पथकांमधील सहकार विभागाच्या २५ अधिकारी व कर्मचाºयांनी रिठद येथील बाळकृष्ण बोरकर व राजाराम आरू यांच्या घरावर अचानक धाडी टाकून अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त केले. या धाडसत्रामध्ये जप्त केलेल्या दस्तावेजाची तपासणी करुन रक्कमेच्या निश्चितीबाबत महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड यांच्यामार्फत तपास सुरु आहे. त्यानंतर संबंधित अवैध सावकाराच्या विरुध्द पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कटके यांनी सांगितले. ही कारवाई रिसोड येथील सहायक निबंधक एम.बी. बनसोडे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिक्षक जी.बी. राठोड, सहकार अधिकारी एन.डी.धार्मिक यांच्यासह अन्य कर्मचाºयांनी केली. पंच म्हणून अकोला व वाशिम जिल्हा कृषी पतसंस्थेचे बी.एन. मोरे, बी.के. सरनाईक, जी.बी. हाडे, डी.ए. मुंढे, बी.टी. धांडे यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे अवैध सावकारीच्या क्षेत्रात सक्रीय असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :washimवाशिम