शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

विनाअनुदानित शाळेवरील कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय देयकाचा प्रश्न जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 3:14 PM

गत दोन वर्षात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील जवळपास ३२०० कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकापासून मुकावे लागले आहे.

वाशिम : विना अनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय देयकाचा प्रश्न अद्यापही निकाली निघाला नाही. यामुळे पश्चिम वºहाडातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.गत काही वर्षात शिक्षण क्षेत्रात विविध निर्णय घेतले जात आहेत. काही निर्णय फायद्याचे तर काही निर्णय शिक्षण संस्था व कर्मचाºयांसाठी घातक ठरत असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी केला आहे. टीईटी संदर्भातील निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांवर नोकरीची टांगती तलवार लटकून आहे. सन २००५ पूर्वी विनाअनुदानित शाळेवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून रूजू झाल्यानंतरही या कर्मचाºयांना जूनी पेन्शन योजना लागू नाही. याबरोबरच विना अनुदानित शाळेवर कार्यरत शिक्षक, शिक्षक कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अद्यापही लागू नाही. त्यामुळे हा एकप्रकारे या कर्मचाºयांवर अन्याय असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती विभागीय शिक्षक संघाने लढा उभारला आहे. अगोदरच विना अनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकही मिळत नसल्याने या अडचणीत भर पडली आहे. गत दोन वर्षात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील जवळपास ३२०० कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकापासून मुकावे लागले आहे. विनाअनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मिळत नसल्याने या कर्मचाºयांवर मोठा अन्याय आहे. हा प्रश्न निकाली निघावा, याकरीता अमरावती विभागीय शिक्षक संघाने लढा उभारला आहे.- अ‍ॅड. किरण सरनाईकअध्यक्ष, अमरावती विभागीय शिक्षक संघ विनाअनुदानित शाळेवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मिळत नाही. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहण्याचा प्रश्नच नाही.- आकाश आहाळेप्रभारी उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, वाशिम 

टॅग्स :washimवाशिम