वाशिम जिल्ह्यातील जून महिन्याचे अन्नधान्य वाटप परिमाण निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:19 IST2018-05-29T15:19:08+5:302018-05-29T15:19:08+5:30

वाशिम : जिल्ह्यातील राज्य शासनाच्या लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जून २०१८ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले.

The quantity of food grain allocation in the month of June is fixed in Washim district | वाशिम जिल्ह्यातील जून महिन्याचे अन्नधान्य वाटप परिमाण निश्चित

वाशिम जिल्ह्यातील जून महिन्याचे अन्नधान्य वाटप परिमाण निश्चित

ठळक मुद्देसर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना प्रति कार्ड १ किलो साखर किरकोळ विक्री दर २० रुपये प्रमाणे आहे. . सर्व लाभार्थ्यांसाठी धान्याचे विक्री दर हे गहू २ रुपये प्रति किलो व तांदुळ ३ रुपये प्रति किलो या प्रमाणे आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील राज्य शासनाच्या लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जून २०१८ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले.

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती ४ किलो गहू व १ किलो तांदुळ, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ३० किलो गहू व ५ किलो तांदुळ आणि एपीएल शेतकरी लाभार्थी यांना प्रति व्यक्ती ४ किलो गहू व १ किलो तांदुळ याप्रमाणे मार्च २०१८ करीता वाटप परिमाण निश्चित केलेले आहेत. सर्व लाभार्थ्यांसाठी धान्याचे विक्री दर हे गहू २ रुपये प्रति किलो व तांदुळ ३ रुपये प्रति किलो या प्रमाणे आहेत. वाशिम जिल्ह्यातील सर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना प्रति कार्ड १ किलो साखर किरकोळ विक्री दर २० रुपये प्रमाणे आहे. जिल्ह्यातील वितरीत होणाºया केरोसीनचे दर वाशिम करिता २५.९५ रुपये प्रति लिटर, मालेगांवकरिता २५.८० रुपये प्रति लिटर, रिसोडकरिता २६.०५ रुपये प्रति लिटर, मंगरुळपीरकरिता २५.८५ रुपये प्रति लिटर, मानोराकरिता २६.०५  रुपये प्रति लिटर व कारंजाकरिता २५.९५ रुपये प्रति लिटर या प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी धान्य व केरोसीन प्राप्त झाल्यानंतर त्याची रोख पावती संबंधित रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी. तसेच अद्यापही आपले आधारक्रमांक आॅनलाईन शिधापत्रिकांना जोडण्यात आले नसल्यास आधार क्रमांकासह सर्व माहिती संबंधित रास्तभाव दुकानदार अथवा संबंधित तहसिल कार्यालयात तत्काळ जमा करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले.

Web Title: The quantity of food grain allocation in the month of June is fixed in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम