शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाला ‘मास्क’ लावा किंवा खिशात ५०० ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:02 IST

वाशिम : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन पुन्हा एकवेळ सज्ज झाले आहे. दुकाने, एस.टी., खासगी वाहने थांबवून ...

वाशिम : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन पुन्हा एकवेळ सज्ज झाले आहे. दुकाने, एस.टी., खासगी वाहने थांबवून त्यात पोलिसांकडून धाडसत्र अवलंबिण्यात आले आहे. तोंडाला मास्क न दिसल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. रस्त्यांवरही कारवाईची ही मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तोंडाला मास्क लावा किंवा दंड भरण्यासाठी खिशात किमान ५०० रुपये ठेवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात मध्यंतरीच्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख खालावला होता. त्यामुळे प्रशासनाने बहुतांश निर्बंध शिथिल करत केवळ लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना लागू ठेवल्या. गेल्या काही दिवसांपासून मात्र पुन्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने अधिक तीव्रतेने डोके वर काढले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची भर पडली आहे. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने सक्तीची पावले उचलत पुन्हा कठोर नियम लागू केले आहेत. त्यानुसार, नागरिकांनी सदोदित तोंडाला मास्क परिधान करणे, सामाजिक व शारीरिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी वारंवार आवाहन करूनही अनेक जण नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या धाडसत्र अवलंबून नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एस.टी. बस, खासगी वाहने, कपड्यांची व अन्य साहित्य विक्रीची दुकाने यांसह सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क घातलेले आढळले नाही तर ५०० रुपये दंड ठोठावला जात आहे. यामुळे विना मास्क प्रवास करणारे व गावभर फिरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

...................

बॉक्स :

पुसद-अकोला एस.टी.बस थांबविली पातुरात

शनिवारी सकाळी ९ वाजता वाशिममार्गे पुसदवरून अकोला जाण्याकरिता निघालेली एस.टी. बस पातूर येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांच्या पथकाने थांबविली. प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून असलेल्या या बसमध्ये अनेकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल लावलेला नव्हता. संबंधितांकडून दंडाची रक्कम वसूल करत त्यांना जागीच रितसर पावतीदेखील देण्यात आली. अचानक पडलेल्या या धाडीमुळे नियम तोडणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले.

...............................

बॉक्स :

८ दिवसांत आढळले ६०९ नवे रुग्ण

जिल्ह्यात १ ते ३१ जानेवारी या कालावधीत ५०६ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर १ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले. या १३ दिवसांत १४६ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले; मात्र १४ फेब्रुवारीपासून अचानक रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या आठ दिवसांतच तब्बल ६०९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

................

बॉक्स :

‘नो मास्क’प्रकरणी १.७५ लाखांचा दंड वसूल

वाशिम शहर वाहतूक विभागाने मुख्य रस्त्यांवर कर्मचारी तैनात केले आहेत. कोणाचीही हयगय न करता तोंडाला मास्क न दिसल्यास संंबंधितांना ५०० रुपये दंड केला जात आहे. १५ फेब्रुवारीपासून २१ फेब्रुवारीपर्यंत या माध्यमातून सुमारे १.७५ लाखांचा दंड वसूल झाल्याची माहिती शहर वाहतूक निरीक्षक नागेश मोहोड यांनी दिली.