Purchase at soya beans lower than MSP Rates | अनसिंग उपबाजारात सोयाबीनची हमीपेक्षा कमी दराने खरेदी
अनसिंग उपबाजारात सोयाबीनची हमीपेक्षा कमी दराने खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग (वाशिम): वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या अनसिंग येथील उपबाजारात सोयाबीनची बेभाव खरेदी व्यापाºयांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात वाशिम बाजार समितीसह इतर सर्वच बाजार समित्यांत सोयाबीनला हमीदरापेक्षा अधिक दर मिळत असताना अनसिंग येथील उपबाजारात चांगल दर्जाच्या सोयाबीनची अवघ्या २८०० रुपये ते ३३५५ रुपये प्रति क्विंटल दराने अर्थात हमीदरापेक्षा ३५० रुपयांहून कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. 
गेल्या १५ दिवसांत आलेल्या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात काढणी केलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. बाजारात गेल्या महिनाभरापासून नव्या सोयाबीनची खरेदीही सुरू झाली आहे. सुरुवातीला नव्या सोयाबीनची खरेदी ३४०० ते ३५०० रुपये दराने हो असली तरी आता मात्र सोयाबीनला चांगले दर मिळू लागले आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत सोयाबीनची ३७०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दराने खरेदी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला तथापि, वाशिम बाजार समितीचा उपबाजार असलेल्या अनसिंग येथील बाजार समितीत मात्र सोयाबीनची कवडीमोल दराने खरेदी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला किमान २८०० रुपये ते ३३५५ रुपये प्रति क्विंटलचे दर दिले जात आहेत. शासनाने यंदा सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटलचे दर घोषीत केले असताना अनसिंग उपबाजारात ३५० रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकºयांची पिळवणूक होत आहे. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी हस्तक्षेप करून शेतकºयांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Purchase at soya beans lower than MSP Rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.