गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची जनजागृती; विद्यार्थ्यांनी काढली रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 14:46 IST2018-11-24T14:45:45+5:302018-11-24T14:46:06+5:30
वाशिम येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून मोहिमेचा जागर केला.

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची जनजागृती; विद्यार्थ्यांनी काढली रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येत्या २७ नोव्हेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात असून शनिवार, २४ नोव्हेंबर रोजी वाशिम येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून मोहिमेचा जागर केला.
प्रारंभी शाळेच्या सभागृहात पालकांची सभा आयोजित करून गोवर-रुबेला लसीकरणाचे महत्व विषद करण्यात आले. प्राचार्य मीना उबगडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी याप्रसंगी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की ९ महिने ते १५ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना दिली जाणारी ही लस बिनधोक आहे. या लसीकरणाचे कुठलेही वाईट परिणाम नाहीत. गोवर या आजाराची बहुतेकांना माहिती आहे; पण रुबेलाबाबत अनेकजण अनभिज्ञ असून लसीकरणाच्या माध्यमातून सर्वांनी सुरक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका प्रणिता हरसुले, अभिजित जोशी यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर शहरातून विद्यार्थ्यांनी रॅली काढून लसीकरण मोहिमेची जनजागृती केली.